Ayodhya Ram Temple Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayodhya Ram Temple: राम मंदिरात 'या' गोष्टी नेण्यास बंदी, वाचा यादी

राम मंदिर प्रवेशाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही रामललाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल

Puja Bonkile

Ayodhya Ram Temple: अयोध्येत प्रभू रामाचे प्राण-प्रतिष्ठापण सोहळ 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील हजारो लोक अयोध्येला पोहोचणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिर प्रवेशाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही रामललाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अन्यथा दर्शनाशिवाय परतावे लागेल.

खाद्यपदार्थ

राम मंदिराच्या आवारात तुम्ही खाद्यपदार्थ सोबत नेऊ शकत नाही. यामध्ये मग घरचे बनवलेले पदार्थ किंवा बाहेरचे पॅक केलेले पदार्थ नेता येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस

मंदिरात प्राण-प्रतिष्ठा करताना तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत नेऊ शकत नाही. मोबाईलपासून ते इलेक्ट्रॉनिक घड्याळ, इअरफोन, लॅपटॉप किंवा कॅमेरा या सर्व गोष्टींवर बंदी आहे.

कपडे

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लोकांना भारतीय पारंपरिक कपडे घालूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसराने कोणताही विशिष्ट ड्रेस कोड नमूद केलेला नसला तरी, भारतीय पारंपारिक पोशाख परिधान करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

बेल्ट आणि शूज

राम मंदिरात प्रवेश करताना बेल्ट, चपला वगैरे घालून मंदिराच्या आवारात प्रवेश करता येणार नाही. तसेच पर्स मंदिराच्या आत नेता येत नाही.

पूजा थाळी घेऊ नका

पूजा थाळीशिवाय मंदिरात क्वचितच लोक येत असतात. परंतु सध्या तुम्ही पूजा साहित्य आणि थाळी घेऊन येथे येऊ नका. कारण या काळात पूजा करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

निमंत्रण पत्र असलेल्यांनाच प्रवेश मिळेल

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 22 जानेवारीला या सोहळ्यात केवळ तेच लोक सहभागी होऊ शकतात ज्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र मिळाले आहे. निमंत्रणाशिवाय येथे येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT