Gardening Mistakes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Mistakes: बागकाम करताना कधीही 'या' 5 चुका करू नका, झाडे होऊ शकता खराब

तुम्हीही बागकाम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Gardening Mistakes: प्रत्येकाला घराभोवती हिरवळ बाग हवी असते. यामुळे केवळ हवा शुद्ध होत नाही तर घराचे सौंदर्य देखील वाढवते. तुम्हीही आजूबाजूच्या परिसरात किंवा घराच्या बाल्कनीमध्ये रोपे लावत असाल किंवा बागकाम करण्याची आवड असेल, तर तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया बागकाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात.

सूर्यप्रकाशाचा अभाव

जर तुम्ही बाहेरची झाडे घरामध्ये ठेवत असाल किंवा त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर झाडांची पाने हळूहळू कोमेजून सुकतात. म्हणून, विशेषतः जर तुमची झाडे लहान असतील तर त्यांना काही तास सूर्यप्रकाशात ठेवावे.रोपांच्या वाठीसाठी सुर्यप्रकाश गरजेचा असतो.

रासायनिक खताचा वापर  

जर तुम्ही रासायनिक खताचा वापर करत असाल तर त्याचा काही दिवस फायदा होऊ शकतो, पण दीर्घकाळासाठी त्याचा वापर घातक ठरू शकतो. त्यामुळे गांडूळ खत किंवा नैसर्गिक खतांचाच वापर केल्यास ते अधिक चांगले होईल.

जास्त किंवा कमी पाणी देणे

जर तुम्ही झाडांना जास्त किंवा कमी पाणी देत ​​असाल तर ते झाडांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. इतकंच नाही तर सूर्यप्रकाशात पाणी घातलं तरी ते झाडांना हानी पोहोचवते. म्हणून, नेहमी सूर्यास्तानंतर किंवा सकाळी सूर्योदयापूर्वी फक्त 1 ते 2 तासांनी झाडांना पाणी द्यावे. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची बाग नेहमी हिरवीगार ठेवू शकता.

योग्य जागा

जेव्हा तुम्ही एखादे रोप लावता तेव्हा दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे. एका भांड्यात 4 ते 5 झाडांच्या बिया टाकून कमी जागेत जास्त रोपे उगवता येतील असा विचार करत असाल तर ही पद्धत योग्य नाही. यामुळे रोप वाढतील पण त्याला फुल-फळं लागणार नाही.

चुकीच्या हंगामात रोपे लावणे

जर तुम्ही महागडे आणि दर्जेदार बियाणे आणले असेल पण तुम्ही ते चुकीच्या हंगामात लावत असाल तर ही झाडे कधीच फुलणार नाहीत. म्हणून, जेव्हाही तुम्ही झाडे किंवा रोपे लावाल तेव्हा प्रथम त्यांना लावण्यासाठी योग्य हंगाम कोणता आहे ते शोधावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT