Astro Tips For Married Women Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Married Women : विवाहित महिलांनी चुकूनही शेअर करू नये या गोष्टी; नाहीतर पती...

इतर लोकांसोबत गोष्टी शेअर करणे ही एक चांगली सवय आहे, परंतु विवाहित महिलांच्या काही सवयी कधीकधी त्रासाचे कारण बनतात.

दैनिक गोमन्तक

Astrology Tips For Married Women : इतर लोकांसोबत गोष्टी शेअर करणे ही एक चांगली सवय आहे, परंतु विवाहित महिलांच्या काही सवयी कधीकधी त्रासाचे कारण बनतात. त्यांच्या वैवाहिक जीवनातही दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

ज्योतिषशास्त्राने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या विवाहित महिलांनी चुकूनही कुणाला शेअर नयेत. या अशा गोष्टी आहेत, ज्या शेअर केल्याने तुमच्या आणि तुमच्या पतीच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.

  • कुंकू

कुंकू हे हिंदू धर्मात सौभाग्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे महिलांनी त्यांचे कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये.

म्हणजे ज्या पेटीत महिला कुंकू ठेवतात ती पेटी चुकूनही दुसऱ्या स्त्रीच्या हातात देऊ नये. तुम्ही देवाला अर्पण केलेले कुंकू किंवा इतर कोणत्याही डब्यातून इतर महिलांना देऊ शकता, परंतु तुमच्या पेटीतील कुंकू कोणत्याही स्त्रीला देऊ नका. तसेच मान्यतेनुसार महिलांनी कुणासमोरही कुंकू लावू नये.

  • काजळ

ज्योतिष शास्त्रानुसार, महिलांनी आपले काजळ इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करणे शुभ नाही. तो सदस्य तुमच्या कुटुंबातील असला तरीही. मान्यतेनुसार, काजळ वाटल्याने पतीचे प्रेम कमी होते आणि विवाहित जोडप्यांमध्ये भांडणे आणि मतभेद होऊ शकतात.

  • टिकली

स्त्रिया बर्‍याचदा सहजपणे त्यांची टिकली दुसऱ्या महिलेला देतात. तुमची टिकली कोणाशीही शेअर करू नका. असे केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय कपाळावरची टिकली काढणे देखील अशुभ मानले जाते.

  • बांगड्या किंवा पैंजण

ज्योतिषशास्त्राचा असा विश्वास आहे की विवाहित स्त्रीने तिच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत. असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे विवाहित महिलांनी त्यांच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीसोबत शेअर करू नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT