Astro Tips For Happy Life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Happy Life: वाईट दिवस संपता संपेना? मग वापरा जोतिषशास्त्रातले 'हे' उपाय...

ज्योतिष शास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो.

दैनिक गोमन्तक

Astro Tips For Happy Life: ज्योतिष शास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. आपण झोपतो तेव्हा आपण अनेक वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही झोपल्यावर देखील तुमचे नशीब उजळवू शकता.

मोराचे पिसे

घरात मोराचे पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते, असे मानले जाते की मोराचे पिसे घरात ठेवल्याने कधीच आर्थिक समस्या उद्भवत नाही. रात्री उशाखाली मोराचे पिस ठेवून झोपला तर तुमची प्रगती खूप लवकर होते. जीवनात शांती आणि आनंद येतो.

मूग डाळ

तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्यासाठी तुम्ही मूग डाळीचा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मूग उशीखाली हिरव्या कपड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला संपत्तीही मिळते तसेच तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते मधुर होते.

तांब्याचे भांडे

झोपण्यापूर्वी तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या, किंवा तुम्ही चेहराही धुवू शकता. असे केल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि व्यवसायातही प्रगती होते.

लसूण

पैसा आहे पण खिशात टिकत नाही, अशा लोकांनी झोपण्यापूर्वी उशाखाली लसणाची पाकळी ठेवावी. असे केल्याने घरात पैसा तुमच्याकडे साठू लागेल.

सुगंधी फुले

तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर उशाखाली सुगंधी फुले ठेवून झोपावे. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT