Astro Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips: तुमची मुलं चिडचिडी आहात का? मग 'या' टिप्स तुमच्यासाठी

ज्योतिषशास्त्रात मुलांच्या चिडचिडी स्वभावाला काही उपाय सांगितले आहेत. तुम्हीही हे उपाय फॉलो करु शकता.

दैनिक गोमन्तक

Astro Tips: अलिकडच्या काही काळात मुलं अत्यंत हट्टीपणा करताना पाहायला मिळतात. त्यांच्या वयानुसार त्यांच्या स्वभावाकडे आपण दुर्लक्ष करतो. पण कधीकधी मुलं इतकी चिडचिडपणा करतात की त्यांच्या रागाला काही थारा राहात नाही.

मग त्यांच्या या रागाकडे आपण लक्ष देऊ लागतो. पण या रागाला कसा आवर घालायचा हे मात्र आपल्याला समजत नाही. ज्योतिषशास्त्रात सांगितल्या प्रमाणे मुलांच्या अशा चिडचिड करण्याच्या स्वभावाला काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

  • कोणता उपाय कराल?

लहान मुलांचा चिडचिडपणा कमी करण्यासाठी तुम्ही अर्धा किलो गव्हाचं पीठ आणि अर्धा किलो साखरेची पावडर हे मिश्रण एकत्र करावे. आता हे मिश्रण तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवावे. असे केल्यानंतर हे पीठ कोणत्याही झाडाच्या मुळाशी असलेल्या मुंग्यांना खाऊ घालावे. मुंग्यांना पीठ खायला घालणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

  • हा उपाय कधी करावा?

मुलांचा चिडचिडपणा कमी करण्यासाठी 11 शुक्रवार हा उपाय करावा. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय मानला जातो.

  • मुंगीलाच का खायला द्यावं पीठ?

धार्मिक मान्यतेनुसार, मुंगीला कीटकांच्या श्रेणीमध्ये नकारात्मक प्राणी म्हणून पाहिले गेले आहे. त्यामुळे तुम्ही या नकारात्मक प्राण्याला जितके जास्त खायला द्याल, तितकी तुमच्या मुलाच्या शरीरातून नकारात्मकता दूर होईल आणि त्याच्या स्वभावात चमत्कारिक बदल दिसून येतील. 11 शुक्रवार हे उपाय केल्यास तुमचे मूल तुमची आज्ञा पाळायला सुरूवात करेल. त्याचा चिडचिडेपणा नाहीसा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

Panaji Traffic Congestion: कॅसिनो अन् बेशिस्त पार्किंगमुळे पणजीची कोंडी! गोवा खंडपीठाचे वाहतूक पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

SCROLL FOR NEXT