Puja Rules Dainik Gomantak
लाइफस्टाइल

संध्याकाळी पूजा करताय? मग चुकूनही करू नका 'या' चुका,मानले जाते अशुभ

हिंदु धर्मात सकाळ आणि संध्याकाळी नियमितपणे पूजा केली जाते. असे म्हणतात की यामुळे घरात सुख-समृद्धी येते. संध्याकाळी पूजा करताना काही खास गोष्टींची काळजी गेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात सकाळची पूजा, दुपारची पूजा आणि सायंकाळची पूजा करण्याचा नियम आहे. जेव्हा दिवस मावळतो तेव्हा हा काळ पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. असे मानले जाते की संध्याकाळी सर्व प्राणी आणि पक्षी आपापल्या घरी परततात. 

पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती देखील संध्याकाळी पृथ्वीवर फिरतात. म्हणूनच आपण संध्याकाळी मनोभावे पूजा केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळू शकेल. संध्याकाळच्या पूजेशी संबंधित काही खास नियम सांगितलेले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

संध्याकाळच्या पूजेच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • सकाळी देवाच्या पूजेसाठी फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. परंतु संध्याकाळी पूजेसाठी फुले तोडू नका. शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे अशुभ मानले जाते. त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करू नका.

  • सकाळच्या पूजेमध्ये शंख आणि घंटा वाजवणे शुभ मानले जाते. कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. पण संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटा वाजवू नका. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी-देवता झोपी जातात आणि शंख किंवा घंटा यांच्या आवाजाने त्यांची विश्रांतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

  • सुर्यदेवाची पुजा टाळावी

शास्त्रामध्ये पहाटे सूर्यदेवाची पूजा करून त्यांना जल अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु सूर्यास्तानंतर कधीही सूर्यदेवाची पूजा करू नका. सूर्यास्तानंतर सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जात नाही. याशिवाय सायंकाळच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर करू नका. सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नका.

  • सुर्यास्तापुर्वी पुजा करावी

देवांच्या विश्रातीमध्ये अडथला येऊ नये म्हणून संध्याकाळी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागेवर पडदा लावा आणि सकाळीच उघडा. संध्याकाळची पूजा सूर्यास्तापूर्वी करावी.

  • तुपाचा आणि तेलाचा दिवा

देवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळी नेहमी दोन दिवे लावावेत. त्यात एक तूप आणि एक तेल असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT