yog Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग 1

योग (Yog) आपल्याला आपल्याच विचारांच्या डबक्यातून बाहेर काढतो.

दैनिक गोमन्तक

कमी वेळात अचूक पद्धतीने काम करण्यावर भर देण्याला कार्यक्षम म्हटलं जातं. आपण दिवसातून किती तास काम करतो यापेक्षा त्या तासांत आपण कोणकोणती कामं केली, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच कॉर्पोरेट विश्वात कार्यक्षम नोकरवर्गाला जास्त महत्त्व आहे. कार्यक्षमता म्हणजे काय हे आपण या आधीच्या लेखात जाणून घेतलं. आता या लेखात कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे महत्त्वाचे पैलू कोणते ते पाहुयात..

1. उद्देश (Purpose)

आपल्या कामात अर्थपूर्णता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. आपल्यापेक्षा मोठे-उदात्त असा उद्देश व ध्येय असल्यास मन संकुचित राहत नाही. उद्देशाला धरून काम केल्यास कार्य साफल्य आणि यशस्वीतेची भावना तितकी मोठी असेल. योग आपल्याला आपल्याच विचारांच्या डबक्यातून बाहेर काढतो. आपल्यातल्या ‘मी’च्या जाणिवेला वारंवार योगाभ्यासाने 'वैश्विक' जाणिवेशी स्वतःला जोडल्यास आपल्या मनाची, बुद्धीची, क्षमतेची उदात्तता व विशालता वाढते आणि आपणच आखून ठेवलेल्या कुंपणाच्या बाहेर जाण्याची भूक लागू लागते. ही अमर्यादता कामात येऊ लागली, की कार्यक्षमता वाढल्याशिवाय राहणार नाही.

2. एक तत्त्व अभ्यास (Focus)

आज अनेक उपकरणांमुळे आणि सतत कुठे काय चालू आहे याची माहिती असण्याची गरज भासत असल्याने मन सारखे बाहेर धावत असते. काही न काही कारणाने मन विचलित होण्याने एका जागी केंद्रित करणे अवघड होते. याला योगसूत्रात 'अलब्धभूमिकत्व' म्हटले आहे. अष्टांग योगातील ‘प्रत्याहार’ आणि ‘धारणा’ हा आपले लक्ष एका जागी केंद्रित ठेवण्यासाठीचा अभ्यास आहे.

याच लेखाशी संबंधित कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे एकाग्रता आणि आरोग्य या पैलूंचे महत्त्व आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT