Microwaveएक पण फायदे अनेक  Dainik Gमायक्रोवेव्हचा वापर फक्त अन्न गरम करण्याशिवाय अनेक काम करण्यासाठी केला जातो. omantak
लाइफस्टाइल

Microwaveएक पण फायदे अनेक

मायक्रोवेव्हचा वापर फक्त अन्न गरम करण्याशिवाय अनेक काम करण्यासाठी केला जातो.

दैनिक गोमन्तक

आजकाल मायक्रोवेव्ह (Microwave) प्रत्येकांच्या घरात असतेच. पण याचा वापर फक्त अन्न गरम करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का मायक्रोवेव्हचा इतर कामासाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे आपले अनेक काम सोपे होतील. चला तर मग जाणून घेवूया मायक्रोवेव्हचे (Microwave) अनेक फायदे कोणते आहेत.

* कपड्यांना डाय करण्यासाठी

मायक्रोवेव्हचा हा एक चांगला उपयोग आहे. तुमचा क्राफ्ट्स आणि टी-शर्ट इत्यादी चांगल्या प्रकारे डाय करता येतो. सिल्कसारख्या कपड्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यावे त्यात कलरफूल ड्रिंक पावडर किंवा नैसर्गिक डाय टाकून मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. नंतर त्या पाण्यात कापड टाकावे.

* लिफाफ्यावरील शिक्का काढू शकता

तुम्हाला जर लिफाफ्यावरील शिक्का काढायचा असेल तर मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. फक्त 20 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये लिफाफा ठेवल्यास स्टॅम्पच्या मागील बाजूस असलेला गोंद सहजपणे निघतो.

* स्वयंपाकघरातील वस्तूंचे निर्जंतुकीकरण

स्वयंपाक घरातील अनेक वस्तु तेलकट होतात. त्या वस्तु स्वच्छ करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करता येतो. स्वयंपाक घरातील स्पंज, कटींग बोर्ड इत्यादी सहजपणे स्वच्छ करता येतात. पाण्यात लिंबांचा रस टाकावा. त्या पाण्यात स्पंज टाकून ठेवावे, नंतर कटींग बोर्ड आणि शेगडीवर हे पाणी 30 सेकंड लावून ठेवावे.

टीप: मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिकचा कटींग बोर्ड ठेवू नये.

* मेडिकल सामानासाठी उपयोग

तुम्ही जर हॉट वॉटर बॅगचा वापर करण्यासाठी गीजरचा वापर करत असाल तर यावर एक सोपा उपाय देखील आहे.टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि नंतर 1 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी गीजर चालू करावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Reopening: गोव्यातील शाळांच्या वेळेत आणि सुट्ट्यांमध्ये मोठा बदल? शिक्षण विभागाचा 'हा' नवा प्लॅन विचाराधीन!

Goa Accident: गोव्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! अज्ञात वाहनानं 6 गायींना चिरडलं; 5 ठार, 1 देतेय मृत्यूशी झुंज

Cyber Crime: 'तुम्ही गुगलवर अश्लील व्हिडिओ पाहता'; सायबर चोरांचे फिल्मी स्टाईल ब्लॅकमेलिंग, महिलेला घातला लाखोंचा गंडा, तिघे अटकेत

Goa Highway: महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांची आता खैर नाही! सरदेसाईंच्या 'त्या' सूचनेवर मंत्री दिगंबर कामतांचा मोठा ॲक्शन प्लॅन

Govt Pensioners: सरकारी निवृत्तीवेतनधारकांची चांदी! 58 टक्क्यांवरून थेट... सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT