Dainik Gomantak  Coconut Oil
लाइफस्टाइल

Skin Care Tips: सन टॅनवर उपचार करण्याचे सर्वोत्तम मार्ग

Skin Care Tips: सनस्क्रीन वापरुन किंवा पूर्ण हाताचे कपडे घालुन सुद्धा तूमची स्कीन टॅन होण्याची शक्यता असतेच.

दैनिक गोमन्तक

नारळाच्या तेलामध्ये (Coconut Oil) भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म (Benefits) असतात, त्वचेची होणारी जळजळ थांबवण्यासाठी ते मदत करतात, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील नारळाच्या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो. टॅनिंग (Taning) ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक स्त्रीला या समस्येचा सामना करावा लागतो. टॅनिंग ही स्त्रीसौंदर्याची एक समस्याच आहे. भारतातील (Indian) हवामान आणि कडाक्याच्या उष्णतेमुळे, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला सनटॅनचा सामना हा करावाच लागतो .

नारळाचे तेल सर्वात ही पहिली आणि सामान्य निवड आहे. त्वचेच्यावरच्या उपचारासाठी नारळाचे तेल औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे, जळजळ होण्यापासून ते त्वचेला शांत करण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग करणे आवश्यक आहे. शक्यतो नारळाचे तेल हे दिवस पेक्षा रात्री वापरावे विशेषतः उन्हात, कारण नारळाचे तेल 90 % टक्के संतृप्त चरबींपासून बनलेले असते आणि ते जाड स्वरूपाचे असते, ज्यामुळे ते उष्णता पकडू ठेवते आणि हे त्वचेला अधिक नुकसानकारक ठरू शकते.

नारळाच्या तेलपासून स्क्रब पॅक:

कॉफी - 1 टेबल स्पून

अक्रोड- 2

काळे मीठ - 1 टेबल स्पून

नारळाच तेल - 1 टेबल स्पून

वरील सर्व मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट करा व हात, कोपर, मान आणि चेहऱ्याला ही पेस्ट लावा या पॅक मुळे टॅन आणि एक्सफोलिएट काढून टाकण्याचा एक चांगला मार्ग आहे. बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, जी आठवड्यातून 2-3 वेळा वापरली जातात तेव्हाच त्याचा परिणाम बघायला मिळतो. परंतु या पॅकमुळे तुम्हाला लगेच परिणाम बघायला मिळेल.

पॅक

बेसन 2 चमचे

दही 1.1/2 चमचा

मध 1 चमचा

नारळाचे तेल 1 चमचा

जेव्हा आपण हा मास्क एकत्र वापरतो तेव्हा यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाइम हे घटक आपल्याला सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर दाह कमी करण्यास मदत करतात, जीवाणूंशी लढतात, आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात तसेच काळवंडलेली त्वचा कमी होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT