IPhone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मोबाईल चार्ज करताना 'ही' गोष्ट टाळाच! आयफोन यूजर्सना अ‍ॅपलचा इशारा

आयफोन युजर्संनी फोन चार्ज करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

चार्जिंग करताना तुम्ही तुमचा आयफोन तुमच्या जवळ ठेवत असाल तर आजपासून ही सवय बंद करा. कारण अॅपलने लोकांना फोन शेजारी चार्जिंगला लावून झोपणे धोकादायक असू शकते असा इशारा दिला आहे. कंपनीने सांगितले की यामुळे आग, इलेक्ट्रिक शॉक, दुखापत किंवा फोनचे गंभार नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी नेहमी मोबाईल चार्जिंगला लावल्यावर दूर ठेवावे. तसेच कंपनीने ब्लँकेट किंवा उशीखाली मोबाईल चार्ज करण्यासाठी ठेऊ नका. यामुळे आयफोन गरम होऊन फोनचे नुकसान होऊ शकते.

  • कंपनीचेच चार्जर वापरावे

आयफोन चार्ज करतांना नेहमी कंपनीचे चार्जर वापरावे. कारण अ‍ॅपल कंपनीने सांगितले की दुसरे चार्जर वापरल्यास ते आयफोनसाठी सुरक्षित मानले जात नाही. तसेच कंपनीने सांगितले की आयफोन चार्ज होत असताना मोबाईलचा वापर टाळावा. फोन चार्ज झाल्यावरच कॉल करावा किंवा त्याचा वापर करावा.

याशिवाय आयफोनला ओलावा नसलेल्या ठिकाणी चार्ज करायला ठेवावे. कारण इलेक्ट्रिक शॉक किंवा फोन डॅमेज होण्याचा धोका राहणार नाही असे कंपनीने सांगितले आहे

  • पुढील महिन्यात नवीन आयफोन सीरीज लाँच होणार

अ‍ॅपल पुढील महिन्यात नवीन आयफोन सीरीज लाँच करणार आहे. iPhone 15 संदर्भात अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत. या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जर मिळणार आहे. iPhone 15 च्या सर्व मॉडेल्समध्ये कंपनी Dynamic Island फीचरसह 48MP कॅमेरा देखील देणार आहे. पण अद्याप फोन लाँच करण्याची तारिख फिक्स सांगितली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT