Angarki Chaturthi 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Angarki Chaturthi: संकट चतुर्थीला या गोष्टी करणे टाळा; उपासनेत घ्या ही काळजी

२०२३ मधील पहिली पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनमध्ये उत्साह आहे.

दैनिक गोमन्तक

वर्षातली पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी मंदिरातमध्ये गर्दी केली आहे. या दिवशी गणेशाची पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या दिवशी काय करू नये, हे देखील लक्षात ठेवावे. कधी-कधी आपण अशा गोष्टी करतो, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. जाणून घेऊया अंगारक चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत.

  • अंगारक चतुर्थीला काय करू नये

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळी वामावर्ती म्हणजेच ज्या गणेशमूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असेल तिची पूजा करावी.

या प्रकारच्या गणेशाच्या पूजेचे नियम कठोर नसतात, सर्वसाधारण पूजा-विधी हा गणेश सहज प्रसन्न होतो आणि साध्या पद्धतीने त्याची पूजा केली जाऊ शकते.

दक्षिणावर्ती सोंडेच्या गणपतीची स्थापना केल्यास सामान्य माणसाला त्याची पूजा करणे कठीण जाते. त्यात तुम्हाला पूजेचे सर्व विधी पाळावे लागतात.

शुभ कार्यात लाल, केशरी, हिरवा, पिवळा रंग नेहमी वापरतात. या दिवशी महिलांनी या रंगांचे कपडे परिधान करावे. काळे कपडे घालू नये. चतुर्थीसाठी काळा रंग अशुभ मानला जातो.

गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी लागते. आज रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करूनच उपवास सोडावा. त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही. अर्घ्य देताना पाण्याचे शिंतोडे पायावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश अजिबात करू नये.गणपतीला दुर्वा प्रिय आहे. यामुळे दुर्वा आणि जास्वदांचे फुल अर्पण करावे.

ज्या महिलांना आरोग्यासंबंधी (Health) समस्या आहेत त्यांनी निर्जल उपवास करू नये.

संकष्टीला घरातील सदस्यांनी काय करू नये

जर तुमच्या घरी अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले जात असेल, तर या दिवशी लसूण, कांदा इत्यादींचे सेवन टाळावे.

गणेशाचे वाहन उंदीर आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका. असे केल्याने गणेशजींना राग येतो, असे मानले जाते.

संकष्‍टी चतुर्थी शुभ मुहूर्त :

पंचांगानुसार संकष्‍टी चतुर्थी प्रारंभ 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी होईल. तर समाप्ती 11 जानेवारी रोजी 2 वाजून 31 मिनिटांनी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT