Anant Chaturdashi 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीला 'हा' धागा बांधल्यास पुर्ण होईल इच्छा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करण्याबरोबरच अनंताचा धागा बांधणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Anant Chaturdashi 2023: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होते. तसेच भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी त्यांच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी 14 गाठी अनंताचा धागा बांधल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच अनंत चतुर्दशीला भगवान श्री हरिची उपासना केल्याने कामाचे शुभ फळ मिळते.

अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर हातावर अनंताचा धागा बांधल्याने खूप फायदा होईल. यासाठी सर्वात पहिले कच्चा धागा हळदीमध्ये भिजवून 14 गाठींचा धागा बनवावा. प्रत्येक गाठ बांधताना भगवान विष्णूचे नाव घ्यावे. त्यानंतर हा धागा कच्च्या गाईच्या दुधात बुडवून ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करून भगवान विष्णूची पूजा करावी.

पूजेनंतर पुरुषांनी हे अनंताचा धागा त्यांच्या उजव्या हाताला आणि महिलांनी डाव्या हाताला बांधावे. रेडीमेड अनंताचा धागा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला अनंताचा धागा स्वतः बनवता येत नसेल तर तुम्ही ते मार्केटमधुन विकत आणू शकता. जर तुम्हाला अनंताचा धागा तुमच्या हातावर बांधता येत नसेल तर तुम्ही ते गळ्यातही बांधु शकता. अनंताचा धागाची प्रत्येक गाठ देवाच्या वेगवेगळ्या नावांचे प्रतिनिधित्व करते.

अनंताचा धागा बांधल्यावर या गोष्टी टाळाव्या

अनंताचा धागा बांधल्यानंतर 14 दिवस मांसाहार करू नये.

तसेच ब्रह्मचर्य पाळावे

अनंताचा धागा बांधल्यानंतर मनात वाईट विचार आणू नका.

या दिवसामध्ये कोणाशी खोटे बोलू नका

मोठ्या लोकांचा किंवा इतर कोणाचाही अपमान करू नका.

असे मानले जाते की विधीने बांधलेला शाश्वत धागा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. यामुळे जगातील प्रत्येक सुख देखील मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT