Amla Maramba Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Amla Maramba Recipe: रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आवळा मुरांबा, एकदा चाखून पहाच

Amla Maramba: आवळ्यात ॲण्टी ऑक्सिडंट्सचे गुण असल्याने अनेक संसर्गांपासून आपले संरक्षण होते.

दैनिक गोमन्तक

Amla Maramba: शरीरासाठी सर्वात आरोग्यवर्धक ठरणारा पदार्थ म्हणजे आवळा. पण आवळा चवीला अंबट, तुरट लागत असल्यामुळे अनेक लोकांना आवळा खायला आवडत नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आवळा हिवाळ्याच्या दिवसात खाणे शरीरासाठी खूप पोषक ठरते. अनेक लोकं आवळ्याचा नाव काढलं तरी तोंड पाडतात. अशा सर्वांसाठी आपण आवळ्याचा मुरांबा कसा बनवायचा? हे जाणून घेणार आहोत.

आवळ्यात असणाऱ्या व्हिटॅमिन-सीमुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. तसेच यात ॲण्टी ऑक्सिडंट्सचे गुण असल्याने अनेक संसर्गांपासून आपले संरक्षण होते. हे सगळे फायदे शरीराला होण्यासाठी आवळ्याचा मुरांबा बनवून खाऊ शकता. हा मुरांबा तुम्ही चपातीसोबत अथवा तसाच खाऊ शकता. थंडीच्या दिवसांत आवळ्याच्या मुरांब्याची टेस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी आहे.

Amla Maramba
  • आवळा मुरांबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 किलो आवळा,

दिड किलो साखर,

6 कप पाणी,

2 चमचे चुना,

1 चमचा लिंबाचा रस

  • आवळ्याचा मुरांबा बनवण्याची कृती

आवळ्यांमध्ये एखाद्या वस्तूच्या मदतीने होल करुन घ्या. आता लिंबू पिळलेल्या पाण्यामध्ये सर्व आवळे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी स्वच्छ पाण्यामध्ये आवळे धुवून, पिळून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात ते आवळे शिजायला ठेवा.

आवळे शिजल्यानंतर पाणी काढून टाका. आता दुसऱ्या भांड्यात 6 कप पाणी, लिंबाचा रस, आणि साखर टाकून पाक बनवून घ्या. छान पाक बनल्यावर त्यात आवळे टाका. मंद आचेवर 5 मिनिट ते शिजवून घ्या. त्यानंतर आवडीनुसार इलायची पुड टाका. बनवलेला हा मुरांबा थंड झाल्यावर मस्त खा आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरुन ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT