Amla Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gooseberry Benefits: थंडीत आवळा खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Gooseberry Benefits: त्यामुळे गरोदर स्रियांना आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमन्तक

Gooseberry Benefits: ऑक्टोबर हीट संपून आता थंडीला सुरुवात झाली आहे. ऋतुनुसार आहारात बदल केला की आपले आरोग्य उत्तम राहते असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकला होत असल्याचे दिसते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही फळांचा, अन्नपदार्थांचा खाल्ली पाहिजे ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

आवळा हे असे फळ आहे की ते खाल्ल्याने हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते. आवळा आयुर्वेदात औषधी मानला जातो. आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच याशिवाय तुमच्या त्वचा आणि केस या दोन्हीसाठी मोठा फायदा होतो. चला तर जाणून घेऊयात, आवळ्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत.

  • गरोदर स्रियांसाठी फायदेशीर

गरोदर स्रीयांसाठी आवळा फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. तुम्हाला येणारी कमजोरी कमी करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे गरोदर स्रियांना आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • फायबर

आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

  • मधुमेह

आवळामध्ये विरघळणारे फायबर असते जे शरीरात साखरेचे प्रमाण कमी होण्यापासून रोखते. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर स्थिर राहते आणि तुम्हाला मधुमेहाची तक्रारीचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे याचे रोज सेवन सुरू केल्यास आरोग्य( Health ) उत्तम राहते.

  • पचनक्रिया व्यवस्थित राहते

आवळा खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे जर तुम्हालाही पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही रोज आवळा खाणे सुरू करावे.

  • तुमच्या आहारात असा आवळ्याचा समावेश करा

आवळा तुमच्या आहारा( Diet )त समाविष्ट करण्यासाठी आवळा मधात मिसळून खा. असे केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो.

अनेकांना आवळ्या तुरट-आंबट चवीमुळे आवळा आवडत नाही. मात्र तो वेगवेगळ्या पद्धतीने तो तुम्ही खाऊ शकता. त्याची आवळा कॅन्डी खाऊ शकता. त्याबरोबरच आवळ्याच्या ज्युसदेखील तुम्ही घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT