Aloe Vera Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aloe Vera Juice: थंडीत कोरफड अशी येते कामी

Aloe Vera Juice: एवढेच नाही तर कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतील.

दैनिक गोमन्तक

Aloe Vera Juice: थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्यावर मोठे परिणाम होत असतात. केस गळती वाढते, कोंड्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त होतात. त्वचादेखील कोरडी होऊ लागते. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या समस्या वाढू शकतात. यासाठी आपण काही घरगुती उपायांचा अवलंब करु शकतो. चला तर जाणून घेऊयात, आपण यावर काय उपाययोजना करु शकतो.

शरीरातील अनेक आजार दूर करण्‍यासाठी कोरफडीचा रस हा रामबाण उपाय आहे. चेहऱ्याची चमक वाढवण्यासोबतच केस दाट आणि चमकदार बनवतात. एवढेच नाही तर कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतील.

हिवाळ्यात कोरफडीच्या रसाचे सेवन करून गळणाऱ्या आणि निर्जीव केसांपासून तुम्ही सहज सुटका मिळवू शकता. अनेकदा आपण कोरफडीचा फेसपॅकमध्ये वापर करु शकतो.

कोरफडीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

1. तुमची त्वचा उत्तम राहते.

2. केसगळती कमी होते.

3. जळजळ कमी होते.

4. शरिराला गरजेचे व्हिटॅमिन्स मिळतात.

5. शरिरातील विषारी घटक दूर होतात.

6. तुम्ही हायड्रेटेड राहता.

अशा प्रकारे, तुम्ही थंडीत स्वत:ची काळजी घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT