alambi DAinik Gomantak
लाइफस्टाइल

Alambi Ranbhaji: अळंबीची रानभाजी तुम्ही खाल्ली का?

Alambi Ranbhaji: किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात.

दैनिक गोमन्तक

Alambi Ranbhaji: पावसाला सुरुवात झाली की विविध रानभाज्यांची रेलचेल असते. गावाकडे राहणाऱ्यांना तर या भाज्यांची चव तर चाखायलाच मिळतेच मात्र शहरात राहणाऱ्यांना देखील या रानभाज्या उपलब्ध होतात. आज आपण अशाच एका रानभाजी बद्दल जाणून घेणार आहोत. ही भाजी म्हणजे अळंबीची भाजी होय.

पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकांची आवडती रानभाजी आहे. परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात.

सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात. कांदाच्या पातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीची भाजी करतात. कोकम घातलेली अळंबीची भाजी देखील चविष्ठ असते. लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक चवदार लागते.

अळंबीची भाजी कशी करावी

साहित्य

1 वाटी खोबरे, 1मोठा कांदा, लसून, 50 ग्रॅम अळंबी चिरलेली

1चमचा गरम मसाला, 1चमचा लाल तिखट

मीठ, तेल

कृती

अळंबीचे तुकडे करुन घ्या. तव्यावर तेलात कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या. अळंबी घालून मिक्स करा त्यानंतर त्यात मसाले घालून घ्या. पाणी आटेपर्यंत गॅस सुरु ठेवा. त्यानंतर तुम्ही या रुचकर पदार्थाची चव चाखू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT