Akshaya Tritiya Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya: कधी आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

यंदा या दिवशी 50 वर्षानंतर एक शुभ योग जुळून येणार असून जाणून घेऊया या दिवशीचे शुभ मुहूर्त आणि महत्त्व

दैनिक गोमन्तक

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मग्रंथातील सर्वात शुभ सणांपैकी एक मानला जातो. हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेच्या दरम्यान येतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यज्ञ, पितृ-तर्पण, जप आणि दान करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीया 3 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या धार्मिक प्रसंगी लोक त्यांच्या प्रियजनांच्या दिवंगत आत्म्याला आदरांजली वाहतात. (Akshaya Tritiya shubh muhurta 2022 news )

* अक्षय्य तृतीया 2022 पुजेचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीया तिथी आरंभ – 3 मे 2022 रोजी सकाळी 5:18 वाजता
अक्षय्य तृतीया तिथी समाप्ती – 4 मे 2022 सकाळी 7:32 पर्यंत
रोहिणी नक्षत्र – 3 मे 2022 सकाळी 12:34 ते 4 मे 2022 पर्यंत पहाटे 3:18 पर्यंत

अक्षय्य तृतीयेचे विधी आणि महत्त्व -

हिंदू पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाली. याशिवाय, प्राचीन आणि पौराणिक इतिहासातील इतर असंख्य श्रद्धा आहेत. ज्या या दिवसाला महत्त्व का मानतात हे स्पष्ट करतात. जैन धर्मात, हा दिवस त्यांचा पहिला देव आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण हे धातू धन आणि समृद्धीची देवी मां लक्ष्मीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत लोक विशेषत: नवीन व्यवसाय, नवीन उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पवित्र प्रसंगी सुरू करतात. यादिवशी बरेच लोक भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात आणि त्यांचे दैवी आशीर्वाद प्राप्त करतात. या दिवशी भगवान कृष्णाच्या मूर्तीला चंदनाच्या पेस्टने सुशोभित केले जाते. या दिवशी दानधर्म करणे, व्रत आणि विवाह समारंभ आयोजित करणे हे देखील पवित्र मानले जाते. अक्षय्य तृतीया सोमवारी आली तर हा सण अधिक शुभ मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT