Agra Petha: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Agra Petha: 'हा' पदार्थ आग्राच्या पेठ्याची आहे खासियत, एकदा नक्की ट्राय करा

आग्राचा पेठा खायला खूप चविष्ट असून बनवायला देखील सोपा आहे.

दैनिक गोमन्तक

Agra Petha: आग्रा पहिले ताजमहालसाठी आणि दुसरे म्हणजे त्याच्या पेठ्यासाठी ओळखला जातो. आग्राचा पेठा खूप प्रसिद्ध आहे. जो तिथे जातो तो ही स्वादिष्ट पेठा खाल्ल्याशिवाय परत येत नाही. आग्राच्या पेठाची अप्रतिम चव असते. आता पेठेचा एवढा आनंद घेताना तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की ते कशापासून बनवले जाते. ज्यामुळे त्याची चव एवढी स्वादिष्ट असते. तो कसा बनवला जातो आणि तुम्ही घरी कसा बनवू शकता हे जाणून घेउया.

तुम्हाला माहिती आहे का हा पेठा एका भाजीपासून बनवला जातो. ही भाजी म्हणजे भोपळा होय. पण पांढरा भापळा याला स्थानिक भाषेत कुम्हडा म्हणतात. यामध्ये चुना मिक्स करुन वापरल्यास स्वादिष्ट पेठे तयार केला जातो.

  • आग्राचा पेठा घरी कसा बनवायचा

सर्वात पहिले तुम्हाला एक मोठा पांढरा भोपळा घ्यावा लागेल.

हा भोपळा नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्यात जास्त साखर टाकण्याची गरज नसते.

नंतर भोपळा कापून त्यातील सोललेल्या बिया आणि लगदा काढून घ्यावा.

भोपळ्याच्या लगद्याचे छोटे तुकडे करा आणि काटाच्या मदतीने छिद्र करा.

आता एक चमचा पांढरा खाद्य चुना घेऊन पाण्यात मिक्स करा आणि त्यात भोपळ्याचे तुकडे टाका.

ते 2 तास चांगले भिजवा आणि नंतर पाण्याने धुवा.

आता एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात भोपळ्याचे तुकडे मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा.

यासोबतच दुसर्‍या भांड्यात पाणी आणि साखरेचे द्रावण तयार करून मंद आचेवर शिजवत राहा, जोपर्यंत चांगला सिरप तयार होत नाही.

आता त्यात थोडा लिंबाचा रस आणि वेलची घाला, तुम्ही केवरा देखील घालू शकता.

भोपळ्याचे तुकडे पूर्ण शिजल्यावर ते पाण्यातून बाहेर काढून जाळीवर ठेवावे म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल.

आता ते साखरेच्या पाकात मिक्स करा, साखरेच्या पाकात थोडा वेळ भिजवू द्या आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT