Adhik Shravan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Adhik Shravan: अधिक श्रावणाचा पहिला शनिवार; शनिदेवाला असे करा प्रसन्न

अधिक श्रावणातील पहिला शनिवार असून शनिदेवाला कसे प्रसन्न करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Adhik Shravan: यंदा 18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे. आज अधिक महिन्यातील हा पहिला शनिवार आहे. शनिवारी काही उपाय केल्यास तुमच्यावर शनिदेव प्रसन्न होतील. शनिवारी मनोभावे शनिदेवाची पूजा केल्याने तुमच्यावर भाग्याचा वर्षाव होऊ शकतो.

  • शनिदोवाची मनोभावे पुजा

शनिदेव जर कोणावर कोपला असेल तर अनेक मार्गांनी गंभीर समस्या समोर येऊ शकतात. त्यामुळे लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध मार्ग शोधतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने धन, समृद्धी, प्रतिष्ठा लाभते आणि समस्यांपासून लवकर सुटका मिळते.

  • शनि स्त्रोत्र

साडेसाती तुमच्या मागे लागली असेल तर शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करावे. असेल केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात.

  • रूईचे पान

शनिवारी रूईचे पान आणि फुलांपासून बनवलेला हार अर्पण करावा. असे करणे शुभ मानले जाते. तसेच शनिदेव देखील प्रसन्न होतात.

  • मोहरीचे तेल

शनिवारी शनिला मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते. जे लोक असे करतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा नेहमी राहते.

  • दान करावे

शनिवारीच नव्हे तर कोणत्याही शुभ दिनी दान करणे शुभ मानले जाते. गरीबांना घोंगडी, उडीद, शनी चालीसा, काळे तीळ, जोडे, चंदन इत्यादी दान करा. हे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. 

  • कावळ्यांना खाऊ घालावे

समस्यांना फुल स्टॉप लावायचा असेल तर शनिवारी कावळ्यांनाही खायला घालणं अत्यंत शुभ मानले जाते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT