8 year old child handled traffic on vip road in kanpur up news tell about traffic rules
8 year old child handled traffic on vip road in kanpur up news tell about traffic rules Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कानपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलाने सांभाळली व्हीआयपी रोडवरील वाहतूक व्यवस्था, एसीपीने सांगितले कारण

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्हीआयपी रोडवर बुधवारी एका आठ वर्षांच्या मुलाने ट्रॅफिकचा ताबा घेतला. खरं तर, पोलिसात भरती होण्याची इच्छा व्यक्त करत, मुलाने एसीपी कर्नलगंजला रहदारीचे नियम शिकण्यास सांगितले होते.त्यानंतर मुलाने दोन तास वाहतूक नियमांनुसार पोलिसांसोबत चौकाचौकात ट्रॅफिक हाताळले.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

बुधवारी सकाळी नवाबगंज परिसरात राहणारा 8 वर्षीय उत्सव चौकाचौकात तैनात असलेल्या पोलिसांना पाहत होता. त्याचवेळी एसीपी कर्नलगंज त्रिपुरारी पांडे यांची नजर त्या मुलावर पडली. हे कळताच मुलाने पोलिसात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.पुढे व्हीआयपी रोडवरील एसीपी कर्नलगंज आणि पोलिसांसोबत मुलानेही 2 तास वाहतूक व्यवस्था हाताळताना नियम समजून घेतले.(8 year old child handled traffic on vip road in kanpur up news tell about traffic rules)

याचे खास कारण एसीपींनी सांगितले

या वेळी सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. लहान मुलाला कायद्याची एवढी जागरूकता पाहून हे कृत्य केल्याचे एसीपी म्हणाले. तसेच शहरात जामची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्यास सहकार्य करावे, असा संदेशही त्यांनी सर्वसामान्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT