Adhar Updates: Change linked mobile number in simple steps  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी तरुणांना वर्षभरात 4 संधी

आता 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तत्काळ अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केल्या. याअंतर्गत मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एकऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

(4 opportunities for youth to link Aadhar card with voter list)

तसेच, आयोग आता निवडणूक संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही इमारतीची मागणी करू शकतो. संसदेने पारित केलेल्या निवडणूक सुधारणा कायदा 2021अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर लिहिले की, "निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर या संदर्भात चार अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी एक तक्ताही शेअर केला आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, यामुळे एकाच व्यक्तीला एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. रिजिजू म्हणाले की, आता 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल किंवा 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तत्काळ अर्ज करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT