Goan Mushroom 
Image Story

Goan Mushrooms: गोंयकारांची मान्सून स्पेशल 'अळंबी'

गोमन्तक डिजिटल टीम
Goan Wild Vegetable Mushrooms

नैसर्गिक भूछत्र्या

पावसाची सुरुवात झाल्यावर काही दिवसांनी बाजारात अळमी दिसू लागतात. जंगलात नैसर्गिकरीत्या उगवून येणाऱ्या या अळमींना भूछत्र्या (मशरुम्स) असेही म्हणले जाते.

Goan Wild Vegetable Mushrooms

खरेदीला झुंबड

बाजारात अळमी आल्याचे कळताच गोवन लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. खरेदीसाठी ते बाजारात गर्दी करतात. सुरुवातीच्या काळात अळमीची किंमत जास्त असते.

Goan Wild Vegetable Mushrooms

विक्री

पावसाळा सुरु होताच लोकांना अळमीचे वेध लागतील. प्रामुख्याने सत्तारी, नेत्रावळी, सांगे तसेच इतर ग्रामीण भागातील जंगलांमधून अळमी बाजारात येते.

शेतकऱ्यांची 'खरेदी'

ग्रामीण भागातील लोक विशेषत: शेतकरी अळमी विकत घेत नाहीत. शक्यतो महिला रानावनात जाऊन अळमी खुडून घेऊन येतात.

Goan Wild Vegetable Mushrooms

औषधी गुण

जुनी मंडळी आजही या भाज्यांचे औषधी महत्व समजावून सांगतात. पावसाळ्यात या रानभाजीचे सेवन केल्यामुळे शरीरास अनेक फायदे होतात म्हणून आवर्जून याचे सेवन करतात.

Goan Wild Vegetable Mushrooms

चवदार भाजी

घराघरांमध्ये बनवला जाणारा गोवन मसाला वापरुन अळमीची चविष्ट भाजी केली जाते. खवय्या मंडळींसाठी ही पर्वणीच असते.

Goan Wild Vegetable Mushrooms

जंगली चव

मार्केटमध्ये मिळणारे कृत्रिम मशरुम्स आणि गोव्यातील जंगली अळमी यांच्या चवीत आणि दिसण्यात जमीन - आसमानाचा फरक आहे. जंगली अळमीची चवच खास असते.

Goan Wild Vegetable Mushrooms

निसर्गाशी नाळ

नैसर्गिक साधन संपत्तीचा जीवनात कसा उपयोग करून घ्यावा हे गोव्याच्या संस्कृतीतून शिकण्यासारखे आहे. गोव्यातील ग्रामीण जीवनाचं निसर्गाशी नाळ जोडलेलं हे सुंदर रूप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT