Mockdrill At Miramar Dainik Gomantak
Image Story

Mockdrill At Miramar : मिरामार समुद्रकिनारी अचानक आले दहशतवादी, अन्...

अतिरेक्यांना रोखण्यास गोव्याचे अतिरेकीविरोधी पथक सक्षम : निधीन वाल्सन

गोमन्तक डिजिटल टीम
Mockdrill At Miramar

देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरेक्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी गोवा पोलिसांनी मिरामार समुद्रकिनारी ‘मॉकड्रिल’ केले.

Mockdrill At Miramar

घटनेच्या ठिकाणी सर्व यंत्रणा वेळेत पोहचून तेथे नियंत्रण मिळवण्याची प्रात्यक्षिके करण्यात आली. मिरामार येथे सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हे मॉकड्रिल करण्यात आले.

Mockdrill At Miramar

पर्यटकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यासाठी आवश्‍यक असलेली तत्परता याबाबत ही तालीम होती.

Mockdrill At Miramar

या ‘मॉकड्रिल’मध्ये पोलिसांसह, अग्निशमन दल, अतिरेकीविरोधी पथक, रुग्णवाहिका, गोव्यातील फोरेन्सिक सायंटिफिक प्रयोगशाळा, श्‍वान पथक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनीच बोगस अतिरेकी तयार करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची तालीम करण्यात आली.

Mockdrill At Miramar

"गोवा पोलिस कोणत्याही प्रकारच्या घटना हाताळण्यात तत्पर आहेत. अतिरेक्यांना रोखण्यास गोव्याचे अतिरेकीविरोधी पथक सक्षम आहेत. या कमांडोजकडे अत्याधुनिक उपकरणे आहेत. येत्या पुढील दिवसात कळंगुट, हणजूण व पेडणे या पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात अशा प्रकारचे मॉकड्रिल करण्यात येणार" असल्याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT