Image Story

मोकळा श्वास घेणारे गोव्याचे फुफ्फुस म्हणजे मिरामार बीच

Gomantak Times
sunset on miramar beach

गोव्यातील कुठलीही जागा पर्यटकांना अचंबित करण्यासारखी आहे. त्यापैकीच एक म्हणजे मीरामार बीच. गोव्यातील  सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे गोव्यातील स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी हे बीच एका लोहचुंबकासारखेच आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि सांस्कृतिक लॉडस्टोन, येथेच विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी हजारो लोक एकत्र येतात.ताजी हवा व शीत समुद्राच्या गार वाऱ्यासाठी पर्यटक या ठीकाणी फिरायला येतात. आणइ म्हणूनच मीरामार बीच ला पणजीचे सर्वात महत्वाचे फुफ्फुस असे म्हटले आहे.

या बीचचे आणखी एक महत्व सांगायचे झाले तर, इथून दिसणारा सुर्यास्त पर्यटकांच्या डोळ्याला भूरळ घालणारा आहे.  सुर्याचे विलोभनिय दृश्य बघायला कुणाला आवडत नाही. बऱ्याचदा कृत्रिम जीवन जगत असतांना कधितरी निसर्गाची आठवण येतेच कारण निसर्गातील सुर्य हा घटक आपल्याला जगण्याची उर्मी देतो. मावळतीच्या या सुर्याचे दर्शन घेण्याचा आनंद आपल्यासा अनुभवायचा असेल तर मीरामार बीच ला नक्कीच भेट द्या आणि जीवनाचा आनंद आपल्या जीवाभावाच्या लोकांसोबत उपभोगा.

मावळतीला जातांना सुर्याचं सुरेख आणि नेहमीपेक्षा वेगळ विलोभनीय दिसणं खूप सुखदायक असतं.  येणाऱ्या नववर्षाच्या पहाटे एक नवी आशा नवा उत्साह हा सुर्य घेवून येईल अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. त्याच्या तुझ्या तेजाने त्याच्या साक्षीने नविन वर्षाचा उत्साह साजरा होऊ शकतो. कोरोनासारख्या जगभर पसरलेल्या विषाणू वर मात करून पुन्हा नव्याने अंतरलेल्या गोड भेटी गाठी होऊ शकते.

तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात याणाऱ्या नविन वर्षाच स्वागत करा आणि समस्त जनसागराला उर्जा, प्रेरणा, आनंद, सकारात्मकता देणाऱ्या या दिनकराला भेट देण्यास मीरामार बीच ला एकदा भेट द्या....
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT