Shigmo Festival In Goa Dainik Gomantak
Image Story

गोव्यातील शिमगोत्सव म्हणजे संगीत, नृत्य, रंगांची उधळण

गोव्यातील शिमगोत्सव हा होळीपूर्वी अगदी आनंदात साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक
Shigmo Festival

शिमगोत्सवामध्ये (Shigmo Festival) गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांची जोशपूर्ण आतषबाजी शिमग्याच्या निमित्ताने ऐकायला मिळते.

Music

या उत्सवावेळी प्रत्येक गावात नवचैतन्य संचारते, ढोल, ताशे, समेळ, घुमट, कासाळे, झांज, यांचा आवाज सर्वसामान्य खेळ गड्यांच्या मनात आनंद लहरी उमटवतो, तोडा तोणयामुळे, तारगडी ही लोकनृत्ये सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या वाड्यावरून बाहेर पडतात.

Goan Culture

समईच्या पेटत्या ज्योतीला साक्ष ठेवून शिमग्यात म्हटल्या जाणा-या गाण्यांना ज्योती, म्हटले जाते. मांडावरील नमन होताच गावच्या देवासमोर नमन घातली जाते. ढोल, तासे, कासाळे ही वाद्ये सूर धरून धरून वाजू लागतात.

Shigmo parade

गोव्यातील शिमगोत्सवात (Shigmo Festival) छत्रीची पूजा केली जाते. तळी` लोकांच्या घरासमोरील अंगणात मेळ नाचायला आला की घरातील महिला एका ताटात नारळ, तांदूळ दरवाज्यात आणून ठेवतात. यालाच तळी असे म्हणतात. मेळात छत्री नाचवली जाते. या छत्रीची पूजा केली जाते.

Dance

गोव्यात (Goa) शिमगोत्सवाची (Shigmo Festival) सुरुवात फोंड्यातून होणार असून पुढे मडगाव,वास्को, पणजी आणि म्हापसा येथे साजरा केला जाणार आहे.

देव-देवतांची पालखी

शिगमोत्सवामध्ये (Shigmo Festival) गोव्यात मांडावर किंवा मंदिरासमोर पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटके सादर केली जातात. गावच्या परंपरेप्रमाणे सीमेपर्यंत देव-देवतांची पालखी वाजत गाजत काढली जाते. तेथे प्रत्येक धार्मिक विधी करून मूळस्थानी परत येतात. काही गावात पालखी प्रत्येक घरासमोर येऊन तिची खणा नारळाने ओटी भरली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT