Valentine's Week 2023 Dainik Gomantak
Image Story

Valentine's Week 2023: यंदा रोज डे, प्रपोज डे, किस डे कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

व्हॅलेंटाईन-डे 14 फेब्रुवारी साजरा केला जात असून त्याआधी अनेक दिवस साजरे केले जातात.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन दिन म्हणून साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. 14 फेब्रुवारीला कपल्स व्हॅलेंटाईन-डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. व्हॅलेंटाईन-डेच्या आधी एक आठवडा वेगवेगळे डेज साजरे केले जातात.

व्हॅलेंटाईन-डेच्या आधी रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे , प्रॉमिस डे,  हग डे, किस डे साजरा केला जातो. जाणून घेऊयात या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत खास गोष्टी कोणत्या आहेत.

रोज डे

व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात रोज-डे ने होणार आहे. हा दिवस ७ फ्रेब्रुवारीला साजरा काले जाणार आहे. मार्केटमध्ये लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. नारंगी गुलाब हे प्रेमातील उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. पिवाळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. पांढरा गुलाब हे  शुद्धता, आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. 

rose day

प्रपोज डे

8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकता. जर तुम्हाला तुमचे प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त करायचे असेल तर त्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जाऊन रिंग किंवा गुलाब देऊन तुम्ही प्रपोज करु शकता. 

prapose day

चॉकलेट डे

'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.९ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट देऊ शकता. 

chocolate day

टेडी डे

एखाद्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टेडी डे साजरा केला जातो. १० फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यांना 'टेडी डे' ला टेडी गिफ्ट करावा. टेडी हा प्रेम, काळजी आणि आपुलकीचे प्रतिक आहे.

teddy day

प्रॉमिस डे

'प्रॉमिस डे' दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वचन देऊ शकता. जेव्हा  कपल्स एकमेकांना वचन देतात, तेव्हा ते या वचनाद्वारे त्यांच्या नात्यामधील प्रामाणिकपणा आणि प्रेम दर्शवतात.११ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जाणार आहे. 

promise day

हग डे

12 फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला तुम्ही मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करु शकता. 

hugg day

किस डे

लेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजे किस डे. किस डेच्या नंतर व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जातो. १३ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जाणार आहे.

kiss day

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT