Rohit Sharma Dainik Gomantak
Image Story

Rohit Sharma: 13 षटकार, 25 चौकारांसह 317 धावा... 'हिटमॅन'चा दुबईत जबरदस्त रेकॉर्ड; जाणून घ्या

Manish Jadhav
Rohit Sharma | Virat Kohli

हिटमॅन

रोहित शर्माला क्रिकेट जगतात 'हिटमॅन' म्हणून ओळखले जाते. त्याला हे नाव मिळाले कारण तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. मैदान कोणतेही असो, गोलंदाज कोणीही असो, रोहितला काहीच फरक पडत नाही. त्याच्या रडारमध्ये येणारा बॉल तो सीमारेषेबाहेर पाठवतो.

Rohit Sharma

चॅम्पियन्स ट्रॉफी

आता रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय कर्णधार हिटमॅन म्हणून नाही तर दुबईचा डॉन म्हणून मैदानात उतरेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हिटमनला दुबईचा डॉन का म्हटले जात आहे? चला तर मग याचे कारण जाणून घेऊया...

Rohit Sharma

दमदार कामगिरी

रोहित शर्माला दुबईचा डॉन म्हणण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची दमदार कामगिरी. दुबईच्या मैदानावर रोहितचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रोहितने 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने 25 चौकार आणि 13 षटकार मारले आहेत. रोहितचा स्ट्राईक रेटही 90 पेक्षा जास्त आहे. त्याने दुबईमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

Rohit Sharma

रोहितची शतकी खेळी

दुबईच्या खेळपट्टीवर रोहितने गेल्या 4 पैकी 3 डावात पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहितने आशिया कपमध्येच पाकिस्तानविरुद्ध 111 धावांची नाबाद खेळी खेळली होती. रोहितने त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 7 चौकार मारले होते. टीम इंडियाने हा सामना 9 विकेट्सने जिंकला होता. रोहित व्यतिरिक्त शिखर धवननेही शतक झळकावले होते.

Rohit Sharma

वेगवान खेळपट्टी

दुबईमध्ये रोहितने धावा काढण्यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे येथील वेगवान खेळपट्टी. दुबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना वेग मिळतो पण चेंडू येथे काही काळासाठीच हलतो. तत्पूर्वी, आता पुन्हा एकदा रोहित शर्मा दुबईमध्ये काय चमत्कार करतो? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT