India vs Australia 1st ODI Dainik Gomantak
Image Story

IND vs AUS 1st ODI: केवळ थलायवाच नाही, तर शरद पवारांसह 'या' नेत्यांनी लुटला मॅचचा आनंद; पाहा Photos

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबई वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे मालिकेसाठी रजनीकांत, शरद पवार, आनंद महिंद्रा अशा अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Pranali Kodre

India vs Australia 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून (17 मार्च) वनडे मालिकेला सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. दरम्यान, पहिल्याच सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.

Rajinikanth

सुपरस्टार रजनीकांत देखील पहिल्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते. सध्या मुंबईत आलेले रजनीकांत यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Rajinikanth with Amol Kale

रजनीकांत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्याबरोबर बसून सामन्याचा आनंद घेतला. याचे फोटोही सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Sharad Pawar, Ramesh Bais, Devendra Fadnavis

इतकेच नाही तर राजकारण क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बायस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सामन्याचा स्टेडियममधून आनंद घेतला.

Anand Mahindra

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा, युट्यूबर गौरव तनेजा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Ajay Devgn

त्याचबरोबर अभिनेता अजय देवगन त्याचा आगामी चित्रपट भोलाचे प्रमोशन करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

Mohammad Azharuddin

याशिवाय भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT