Punjabi singer Guru Randhawa and Nora Fatehi on Goa beach Dainik Gomantak
Image Story

पंजाबी गायक गुरु रंधावा आणि नोरा फतेही गोवा वाले बीच पे...

नोरा आणि गुरुच्या फोटोंची सोशल मिडियावर चर्चा

दैनिक गोमन्तक
Punjabi singer Guru Randhawa and Nora Fatehi on Goa beach

'दिलबर गर्ल' नोरा फतेही (Nora Fatehi) आणि पंजाबी गायक गुरु रंधावा (guru randhawa) यांनी 'नाच मेरी रानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले होते. अलीकडेच नोरा आणि गुरूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही गोव्याच्या बीचवर (goa beach) दिसत आहेत. नोरा आणि गुरुचे हे फोटो (Photo) पाहून लोक अंदाज लावत आहेत की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

Punjabi singer Guru Randhawa and Nora Fatehi on Goa beach

फोटोंमध्ये नोरा पांढऱ्या क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले असून ती या लूकमध्ये हॉट दिसत आहे. तर गुरू ग्रे प्रिंटेड शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. दोघेही गोव्याच्या किनाऱ्यावर फिरताना आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. नोरा आणि गुरूचे हे फोटो पाहून दोघांचे अफेअर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित दोघे एखाद्या गाण्याच्या शूटसाठी गोव्याला गेले असतील मात्र नोरा आणि गुरुचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

Punjabi singer Guru Randhawa and Nora Fatehi on Goa beach

नोराबद्दल सांगायचे तर, नुकतेच ती 'सत्यमेव जयते 2' चित्रपटातील 'कुसु कुसू' या गाण्यात दिसली होती. या गाण्यातील तीची अदा लोकांना खूप आवडली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील नोराचे 'दिलबर दिलबर' हे गाणेही खूप गाजले होते. नोराने सलमान खानचा चित्रपट 'भारत' आणि अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटातही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे, ज्याची सिनेरसिकांनी खूप प्रशंसा केली.

Punjabi singer Guru Randhawa and Nora Fatehi on Goa beach

दरम्यान, नारा आणि गुरू दोघे कोणत्या म्युजिक व्हिडीओसाठी एकत्र आले आहेत की ते रिलेशनशिपमध्ये आहेत हे सध्या स्पष्ट झाले नाही. नोरा आणि गुरुने नाच मेरी राणी या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये यायला पाहिजे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT