Sirisha Bandla Dainik Gomantak
Image Story

PHOTOS: ताऱ्यांचे स्वप्न पाहणारी सिरीशा बंदला ठरली अंतराळात जाणारी तिसरी भारतीय महिला

नुकतीच सिरीशा बंदला भारतात आली होती आणि तिच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावाला भेट दिली होती.

दैनिक गोमन्तक
Sirisha Bandla

भारताशी असलेल्या तिच्या नात्याचे वर्णन करताना, सिरीशा सांगते की तिचा जन्म आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिराला गावामध्ये झाला. ती पाच वर्षांची असताना तिचे पालक अमेरिकेमध्ये गेले. त्यावेळी तिला तेलुगू भाषा येत होती आणि अमेरिकेत जाऊन ती इंग्रजी भाषा शिकली.

Sirisha Bandla

एरोनॉटिकल इंजिनीअर होण्याच्या प्रेरणेबाबत सिरिशा सांगते की, लहानपणी भारतात राहताना रात्री दिवे बंद झाल्यावर ती ताऱ्यांकडे बघत बसायची. ती तिच्या आई-वडिलांसोबत प्रत्येक एअर शो आणि स्पेस म्युझियममध्ये ती जात असे.

Sirisha Bandla

सिरीशा बंदला ही अंतराळात जाणारी चौथी भारतीय वंशाची अंतराळवीर आहे तर याआधी राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स हे अंतराळात गेले आहेत.

Sirisha Bandla

सिरीशा बंदलाने पर्ड्यू विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि जॉर्जटाउन विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पूर्ण केले आहे.

Sirisha Bandla

सिरिशाने 2015 मध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ती Vice President बनली. नुकतेच तिने 747 विमानाचा वापर करून उपग्रह अवकाशात पाठवला होता.

Sirisha Bandla

सिरिशा बंदलाच्या करिअरची सुरुवात व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीपासून झाली नाही. तर, या कंपनीत काम करण्यापूर्वी तिने टेक्सासमध्ये एरोस्पेस अभियंता म्हणूनही काम केले. सिरीशाने कमर्शियल स्पेस फ्लाइट फेडरेशन (CSF) मध्ये देखील काम केले आहे.

Sirisha Bandla

सिरिषा तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (TANA) शी देखील संबंधित आहे तर ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी इंडो अमेरिकन संस्था आहे. सिरिशाचे वडील डॉक्टर मुरलीधर हे व्यवसायाने शास्त्रज्ञच आहेत. फोटोमध्ये, सिरीशा बंदला तिचा प्रियकर शॉन ह्यूसोबत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT