NITI Aayog Meeting
NITI Aayog Meeting  ANI
Image Story

NITI आयोगाच्या बैठकीला या 2 राज्याचे मुख्यमंत्री सोडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी

दैनिक गोमंतक
NITI Aayog Meeting

NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलची सातवी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसह इतर केंद्रीय मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

NITI Aayog Meeting

राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात ही बैठक झाली. दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री आणि मंत्री प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित राहिले, कारण कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये ही बैठक होऊ शकली नाही आणि 2021 मध्ये आभासी बैठक झाली.

NITI Aayog Meeting

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

NITI Aayog Meeting

राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान इत्यादी NITI ची सर्वोच्च संस्था गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत उपस्थित होते.

NITI Aayog Meeting

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पिकांच्या किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पाणी, शेतकऱ्यांचे कर्ज, एमएसपीची कायदेशीर हमी, कालवा प्रकल्प, बुढा नाला (लुधियाना), बीबीएमबी (भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ) आणि आरोग्य क्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला.

NITI Aayog Meeting

NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांची प्रकृती विचारली. यादरम्यान पीएम मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचीही भेट घेतली आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली.

NITI Aayog Meeting

NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या प्रकृतीची विचारणा केली. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील YCRCP ने NDA उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

NITI Aayog Meeting

NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live News Update: बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

SCROLL FOR NEXT