Yamaha RD350 LC  Twitter
Image Story

MS Dhoni Special Bike: भारतात लॉन्च झाली नाही, तरीही धोनी चालवतो ही बाइक, पाहा फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) बाइकप्रेम सर्वश्रुत आहे. त्याच्याकडे बाइक आणि कारचां मोठं कलेक्शन आहे.

दैनिक गोमन्तक
Yamaha RD350 LC

Yamaha RD350 LC: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) बाइकप्रेम सर्वश्रुत आहे. त्याच्याकडे बाइक आणि कारचां मोठं कलेक्शन आहे. आता माहिच्या गॅरेजच्या वैभवातएका नविन बाइकने भर घातली आहे. ही यामाहा बाइक तुम्ही बघितली आहे का? जी भारतात कधीही लॉन्च झाली नाही. या स्टाईलिश बाइकचे नाव Yamaha RD350 LC आहे. भारतात ही बाइक लॉन्च झाली नसली तरी बाइकप्रेमींनी ती बाहेरून खरेदी केली आहे. धोनी देखील अशा काही भारतीय लोकांपैकी एक आहे जो ही आलिशान बाइक लॉन्च न झाल्यानंतरही देशातील रस्त्यांवर चालवण्याचा आनंद घेत आहे. (MS Dhoni Special Bike Yamaha RD350 LC)

Yamaha RD350 LC

ही बाइक धोनीसाठी चंदीगड-आधारित वाहन पुनर्संचयन सेवा प्रदाता ब्लू स्मोक कस्टम्सने कस्टमाइज केली आहे. या बाइकची निर्मिती 1980 ते 1983 या काळात झाली. यामाहा RD350 LC कंपनीने नवीन टेक्नोलॉजी आणि फीचर आणल्यामुळे तसेच नियम कडक केल्यामुळे या बाइकवर बंदी करण्यात आली. त्याच्या जागी कंपनीने RZ350, RD350 LC2 आणि RD350 YPVS सारखी मॉडेल्स बनवायला सुरुवात केली.

Yamaha RD350 LC

महेंद्रसिंग धोनीसाठी ही बाइक कस्टमाइज करताना, बाइकच्या मूळ फिचर्सला तडा जाणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परफॉर्मन्सच्या आघाडीवर यामध्ये काही सुधारण्याचा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोलाकार हेडलॅम्प, टर्न इंडिकेटर, रीअर व्ह्यू मिरर, ट्विन-पॉड अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्कल्पटेड फ्यूल टाकी डिझाइन आणि आयताकृती टेल लॅम्प यासारख्या मूळ स्वरूपातील वैशिष्ट्ये कस्टमायझेशननंतरही कायम ठेवण्यात आली आहेत.

Yamaha RD350 LC

विशेषत: धोनीसाठी तयार करण्यात आलेल्या कस्टमाइज व्हर्जनमध्ये सीट सेक्शनमध्ये बदल करण्यात आला आहे. बाइकचे स्पोर्टी लूक अनेकांना आकर्षित करते. धोनीच्या या बाइकला पिवळा आणि काळा अशी ड्युअल कलर थीम देण्यात आली आहे. हा कलर कॉम्बो कंपनीच्या मूळ आवृत्तीतही उपलब्ध होता. पुढील मडगार्ड, इंधन टाकी, साइड पॅनल्स आणि टेल विभागात पिवळा रंग वापरण्यात आला आहे.

Yamaha RD350 LC

धोनीसाठी बाइक खास बनवण्यासाठी, माजी कर्णधाराचा आवडता क्रमांक '7' त्याच्या टाकीवर कोरण्यात आला आहे, जो फ्युल टाकीवर स्पष्टपणे दिसू शकतो. 7 क्रमांकांशी धोनीचा संबंध खूप जुना आणि खास आहे. 7 नंबरची जर्सी घालून तो क्रिकेटच्या मैदानात उतरायचा.

Yamaha RD350 LC

Yamaha RD350 LC बद्दल बोलायचे झाल्यास, यात 347CC समांतर ट्विन, टू-स्ट्रोक मोटर देण्यात आली आहे, जी 49hp ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन एकच असून बाइकला बाहेरून नवे भाग जोडून बाइकची कार्यक्षमता सुधारली आहे. किटमध्ये Uni air फिल्टर, JL twin exhausts, NGK स्पार्क प्लग, Zeeltronic Programmable CDI, Moto Tassinari द्वारे VForce4 रीड व्हॉल्व्ह सिस्टम, Lectron carburettor, LMC सिलिकॉन रेडिएटर सोलंट होज आणि Metmachex अॅल्युमिनियम स्विंगआर्मचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT