Mouni Roy Wedding Pics Twitter
Image Story

दक्षिण गोव्यात थाटात पार पडला मौनी रॉय आणि सूरज नांबियारचा विवाह सोहळा

Mouni Roy Wedding Pics: मौनीचे लग्न गोव्यातील एका आलिशान ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडले. मौनीच्या लग्नाला टीव्ही स्टार्सनी हजेरी लावली होती.

Priyanka Deshmukh
Mouni Roy Wedding Pics

Mouni Roy Weds Sooraj Nambiar: मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी दक्षिण भारतीय परंपरेनुसार लग्न केले आहे. दक्षिण गोव्यात मौनी आणि सूरजचा हा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांच्या या विवाहानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो येऊ लागले आहेत, ज्यामध्ये सूरज मौनीला मंगळसूत्र घातलताना दिसत आहेत. मौनीने पांढऱ्या आणि लाल बॉर्डरची साडी नेसली आहे, तर सूरज इंडियन ग्रूम लूकमध्ये कुर्ता घातलेला दिसत आहे.

Mouni Roy Wedding Pics

27 जानेवारीला मौनीचे लग्न गोव्यातील एका आलिशान ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडले. मौनीच्या लग्नाला अर्जुन बिजलानीपासून मंदिरा बेदीपर्यंत अनेक टीव्ही स्टार्सनी हजेरी लावली होत. त्याचबरोबर मौनी आणि सुरजच्या अनेक मित्रमंडळींनीसुद्धा या लग्नाला हजेरी लावली होती.

Mouni Roy Wedding Pics

आता बंगाली रितीरिवाजानुसार होणार मौनी आणि सूरजचे लग्न!

दोक्षिणात्य पद्दतीने लग्न झाल्यानंतर मौनी आणि सूरज बंगाली परंपरेनुसार लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. अशा परिस्थितीत मौनीला बंगाली वधू बनताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. यापूर्वी, सोशल मीडियावर मौनीचे अनेक फोटो समोर आले होते ज्यात ती तिच्या हळदीचा आनंद घेताना दिसत होती. मौनीने हळदीच्या कार्यक्रमाला पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये ती सूरजसोबत नाचताना आणि हळद लावताना दिसत होती.

Mouni Roy Wedding Pics

या स्टार्सने मौनीच्या लग्नसोहळ्याला लावली हजेरी

यादरम्यान अनेक टीव्ही स्टार्सनी मौनीच्या मेहंदीला हळदीला हजेरी लावली, अभिनेत्री आशिका, मंदिरा बेदी आणि अभिनेता अर्जुन बिजलानी यांनीही मौनीच्या हळदीला हजेरी लावली होती आणि खूप डान्स करताना दिसले होते. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील मेहंदी लगा ले रखना या सुपरहिट गाण्यावर अर्जुन आणि मंदिरा थिरकतांना दिसले.

Mouni Roy Wedding Pics

मौनी रॉय आणि सूरज दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, दोघेही पहिल्यांदाच दुबईमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांना पसंत पडले. आणि पुढे दोघांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले आणि आज ते खर्या अर्थाने लग्नबंधनात अडकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT