Verna Industry Dainik Gomantak
Image Story

Verna Industry: स्क्रॅप गोदामाला भीषण आग; जवळपास 1 लाखांचे नुकसान

वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग

दैनिक गोमन्तक
Major fire reported at verna

वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागून जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना आज संध्याकाळी पावणे पाच वाजता घडली. वेर्णा अग्नी शमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यन प्रयत्न चालू होते.

Major fire reported at verna

वेर्णा औद्योगिक अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका स्क्रॅप गोदामाला आग ‌लागण्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यन्त आगीने रुद्रावतार घेतला होता. सदर स्क्रॅप यार्डमध्ये लाकडी साहीत्य, प्लास्टीक साहीत्य व इतर वस्तूंचे ढीग असून लाकडी साहित्याला आग लागून पेट घेतला. आग वाढत गेल्याने वास्को, मडगाव व इतर ठीकाणाहून अग्निशमन बंब मागवण्यात आले.

verna

जागा अडगळीची असल्याने बंब स्क्रॅप याडॆमध्ये घेण्यास अग्निशमन दलाला त्रास सहन करावा लागला. तसेच आग वाढत गेल्याने जेसीबीद्वारे सामान पसरवून आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.

Major fire reported at verna

दरम्यान स्क्रॅप मालकाने तेथून पळ काढल्याचा बिचोलकर यांनी सांगितले. तसेच स्क्रॅपयार्ड मधील कुणाकडूनही मदत मिळाली नसल्याचे बिचोलकर यांनी सांगितले डूरोलाईन या कंपनीने पाणी पुरवण्याचे मदत कार्य केल्याचे बिचोलकर यांनी सांगितले.

Major fire reported at verna

वेर्णा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले सदर आग येथील जवळच ड्रायग्रासला आग लागून लागल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT