Snake  
Image Story

किंग कोब्रा, घोणस, फुरसे! गोव्यात आढळणारे विषारी - बिनविषारी साप तुम्हाला माहितीयेत का?

गोमन्तक डिजिटल टीम
Indian Cobra

नागपंचमी

नागपंचमी हा सण आज भारतभर साजरा केला जातो. आजचे औचित्य साधून गोव्याच्या जंगलात आढळणाऱ्या सापांच्या निवडक प्रजातींची माहिती घेऊ.

King Cobra

किंग कोब्रा

नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतात दुर्मिळ होत चालला आहे. याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर आडवे पट्टे असतात.

Russell's Viper

घोणस/कुसडो मांडूळ

भारतात सर्वाधिक मृत्यू या सापाच्या दंशामुळे हाेतात. या सापाला बिनविषारी अजगर समजण्याची चूक होते. त्याच्या अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात.

Saw Scaled Viper

फुरसे

हा भारतात आढळणाऱ्या चार मोठ्या विषारी सापांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचे खवले एकमेकांवर घासल्यामुळे करवतीसारखा आवाज तयार होतो. याचे डोके त्रिकोणी असते.

Common Crait

मण्यार

या सापाचे विष नागापेक्षा अधिक शक्तिशाली असते.‌ साधा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.

Banded Kukri

कुकरी 

हा बिनविषारी साप शक्यतो पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात आढळतो.

Indian Python

अजगर

घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवर यांचा वावर असतो. अजगराच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. 

Vine Snake

हरणटोळ

हरणटोळ साप जंगलांमध्ये सापडतो. हा पूर्णपणे झाडावरच राहतो आणि जगतो तसेच नेहमी वेलींवर,फांद्यांवर दिसून येतो. जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो.

Whitakers Boa

मांडूळ

लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.  शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT