KK and Lata mangeshkar  Dainik Gomantak
Image Story

KK पासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेक दिग्गज गायकांनी 2022 मध्ये सोडले जग

Bollywood Singer: करोडो ह्रदयावर राज्य करणारा बाॅलिवूडचा प्रसिध्द गायक केके यांचे दुःखद निधन झाले.

दैनिक गोमन्तक
KK

आतापर्यंत 2022 हे वर्ष बॉलीवूडसाठी खूप दुःखदायक ठरले आहे. अवघ्या 6 महिन्यांत भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आज आपण अशाच काही गायकांबद्दल जाणून घेणार आहोत

KK

31 मे 2022 रोजी रात्री कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान परफॉर्म केल्यानंतर, प्रसिद्ध गायक केकेची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले जेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केकेने हम दिल दे चुके सनममधील तडप तडपसह अनेक हिट गाणी गायली आहेत. केके 53 वर्षांचे होते.

Lata Mangeshkar

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचेही दीर्घ आजाराने 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. लतादीदी या 92 वर्षांच्या होत्या.

Bappi Lahiri

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सुमारे 9 दिवसांनी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी महान गायक आणि संगीत दिग्दर्शक बप्पी दा यांचे निधन झाले. इतक्या कमी कालावधीत दोन दिग्गजांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते 69 वर्षांचे होते.

सिद्धू मूसवाला

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे 29 मे रोजी निधन झाले. त्याला काही हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. 31 मे रोजी सिद्धू यांच्यावर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 28 वर्षांचे होते.

धर्मेश पवार

प्रसिद्ध रॅपर धर्मेश पवार उर्फ ​​MC Demolition यांचा या वर्षी 21 मार्च रोजी मृत्यू झाला. ते 24 वर्षांचे होते. त्याने झोया अख्तरच्या गली बॉयमध्येही काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT