Shivam Dube-Ajum Khan Dainik Gomantak
Image Story

Shivam Dube-Ajum Khan: पाहा भारतीय क्रिकेटपटूच्या विवाहसोहळ्याची खास झलक

Shivam Dube-Ajum Khan: या लग्नात हिंदू-मुस्लिम प्रथांची झलक स्पष्टपणे दिसून आली.

Priyanka Deshmukh

भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबे काल शुक्रवारी लग्नबंधनात अडकला. त्यांने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. या अष्टपैलू खेळाडूने मुंबईत त्याची मैत्रीण अजूम खान हिच्याशी लग्न केले आहे.(Indian Cricketer shivam dubey married withAjum Khan)

Shivam Dube-Ajum Khan
Shivam Dube-Ajum Khan

एका फोटोमध्ये शिवम अजूमबरोबर प्रार्थना करताना दिसत आहे तर त्याचवेळी एका फोटोमध्ये शिवम आणि त्याची पत्नी एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत.

या लग्नात हिंदू-मुस्लिम प्रथांची झलक स्पष्टपणे दिसून आली. शिवमने टीम इंडियाकडून एक वनडे आणि 13 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने 21 वेगवेगळ्या संघांसह आयपीएलमध्येही आपली उत्तम कामगिरी बजावली आहे. शिवम सध्या राजस्थान रॉयल्ससोबत आहे.

Shivam Dube-Ajum Khan

2018 मध्ये रणजी करंडक स्पर्धेदरम्यान बडोद्याविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेने एका ओवरमध्ये पाच षटकार ठोकले होते त्याने त्याचे खुप कौतुक झाले होते आणि तो चर्चेत आला होता. शिवमने दोनदा हा पराक्रम केला आहे.

Shivam Dube-Ajum Khan

याआधी टी -20 मुंबई लीगमध्ये त्याने प्रवीण तांबेच्या षटकात पाच षटकार ठोकले आहेत. रणजीच्या कामगिरीच्या जोरावर आयपीएल 2019 च्या लिलावात त्याला मोठी रक्कम मिळाली होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पाच कोटींमध्ये खरेदी केले होते.

Shivam Dube-Ajum Khan

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

Goa Politics: खरी कुजबुज; ...काँग्रेस उत्‍पलसोबत राहणार?

Mormugao Port Coal Pollution: कोळसा हाताळणीविरोधात एकमत; मुरगाव पालिकेत ठराव मंजूर, ठोस कृती आराखड्याचा आग्रह

SCROLL FOR NEXT