आयसीसीने (International Cricket Council) मंगळवारी (28 जानेवारी) रोजी अंतिम पुरस्कार जाहीर केला. 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीकडून पुरस्कार देण्यात आलेत.
पुरस्कार पुरुष आणि महिला गटात देण्यात आले. भारतातील 3 खेळाडूंनी आयसीसीचे 3 मोठे पुरस्कार जिंकण्यात यश मिळवले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीचा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला. बुमराहला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आयसीसी पुरुष टी20 क्रिकेटपटू ऑफ द इयर जिंकला, तर भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू: जसप्रीत बुमराह
सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू: अमेलिया केर
आयसीसी पुरस्कारांची यादी (पुरुष)
सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू: जसप्रीत बुमराह
सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू: अझमतुल्ला उमरझाई
सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू: अर्शदीप सिंग
उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू: कामिंदू मेंडिस
सर्वोत्तम असोसिएट क्रिकेटपटू: गेरहार्ड इरास्मस
आयसीसी पुरस्कारांची यादी (महिला)
सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू: स्मृती मानधना
सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू ऑफ द इयर: अमेलिया केर
सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू: अॅनेरी डिर्कसेन
आयसीसी महिला असोसिएट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार: ईशा ओजा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.