बदलते तंत्रज्ञान: तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात स्पर्धा अधिक कठिण होत चालली आहे. नोकऱ्यांचे मार्गही बदलत आहेत. काही वर्षांपूर्वी ज्या कोर्सची डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही.
बदलती मागणी: आज (13 ऑक्टोबर) आपण 'या' फोटोस्टोरीच्या माध्यमातून भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याबद्दल जाणून घेणारोत.
स्पर्धेचे युग: सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपूर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स: 2050 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग विशेषज्ञांची खूप गरज असेल.
डेटा एनालिस्ट आणि सायंटिस्ट: डेटा एनालिस्ट आणि सायंटिस्टची मााागणी सतत वाढणार आहे. डेटा सायंटिस्टचे पगारदेखील खूप वाढतील.
बायोटेक्नोलॉजी आणि जेनेटिक इंजिनीअर: बायोटेक्नोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंगची मागणी खूप असेल. या क्षेत्राचे ज्ञान घ्यायला आतापासून सुरुवात करा.
सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनीअर्स: नवे सॉफ्टवेअर, अॅप्स आणि प्रोग्रामिंग भाषेचा विकास होत असताना सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनीअर्सची गरज भासणार आहे.
रोबोटिक इंजिनीअर्स: औद्योगिक आणि घरेलू क्षेत्रात स्वचलित रोबोट्सची मागणी वाढेल. रोबोटिक इंजिनीअर्सचे करिअरदेखील फायदेशीर ठरेल.
स्पेस एक्स्प्लोरेशन आणि एअरोस्पेस इंजिनीर्स: स्पेस टेक्नोलॉजी आणि अंतराळ कार्यासाठी तंत्रज्ञान माहिती असलेल्या स्पेस एक्स्प्लोरेशन आणि एअरोस्पेस इंजिनीर्सची मागणी वाढेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.