Harry Kane, Lionel Messi and Cristiano Ronaldo Dainik Gomantak
Image Story

Football Records: तीन सामने, तीन रेकॉर्ड्स! रोनाल्डो, मेस्सीसह हॅरी केनच्याही शिरपेचात मानाचा तुरा

गेल्या दोन दिवसाच झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये खेळताना मेस्सी, रोनाल्डो आणि हॅरि केनने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Harry Kane, Lionel Messi and Cristiano Ronaldo Football Records: फुटबॉलविश्वासाठी गुरुवार आणि शुक्रवार रेकॉर्डब्रेक राहिला. या दोन दिवसात काही आंतरराष्ट्रीय सामने झाले. या सामन्यांमध्ये लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, हॅरि केन असे दिग्गज खेळताना दिसले. दरम्यान, या तिघांनीही विविध विक्रमही नोंदवले. याच विक्रमांचा घेतलेला आढावा.

Harry Kane

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू हॅरि केनने वेन रुनीचा मोठा विक्रम मागे टाकला आहे. युरो 2024 स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यात इंग्लंडने इटलीला 2-1 अशा गोलफरकाने पराभूत केले. या सामन्यात गोल करताना हॅरि केन इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

Harry Kane

हॅरि केनने इटलीविरुद्ध खेळताना इंग्लंडकडून कारकिर्दीतील 54 वा गोल नोंदवला. त्यामुळे त्याने वेन रुनीच्या 53 गोलच्या विक्रमाला मागे टाकले आहे. हा केनचा 81 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

Lionel Messi

याशिवाय अर्जेंटिनाने शुक्रवारी पनामाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. यासामन्यादरम्यान मेस्सीने एक गोल केला. हा त्याच्या वरिष्ठ स्तरावर खेळताना केलेला कारकिर्दीतील 800 वा गोल ठरला.

Lionel Messi

तो ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर 800 करियर गोल करणारा दुसराच खेळाडू आहे. मेस्सीने आत्तापर्यंत बार्सिलोनासाठी 672 गोल केले आहेत, तसेच पॅरिस सेंट जर्मेनसाठी 29 आणि अर्जेंटिनासाठी 99 गोल केले आहे.

Cristiano Ronaldo

रोनाल्डोही गुरुवारी पोर्तुगालकडून लिश्टनस्टाइनविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात पोर्तुगालने 4-0 असा विजय मिळवला. हा सामना रोनाल्डोसाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 197 वा सामना ठरला. त्यामुळे रोनाल्डो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

Cristiano Ronaldo

रोनाल्डोने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत कुवेतच्या बाडेर अल-मुतवाला मागे टाकले आहे. त्याने 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT