हरियाली तीजदरम्यान 'या' गोष्टी करणे टाळा Dainik Gomantak
Image Story

Hariyali Teej 2021: हरियाली तीजदरम्यान 'या' गोष्टी करणे टाळा

उपवासदारम्यान चिडचिड (Irritability) करणे टाळावे.

दैनिक गोमन्तक

श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीय तिथीला हरियाली तीज (Hariyali Teej) उपवास केला जातो. या दिवशी माहादेव आणि पार्वती एकत्र आले होते, म्हणूनच या दिवशी शिव-पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते कारण या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याचा त्याग करतात. या व्रतामुळे विवाहित (Married) जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तीजच्या दिवशी विवाहित महिला (Married woman) शृंगार (Makeup) करून पूजा करतात. जाणून घेऊया उपवासामध्ये काय करावे आणि काय करू नये.

* काय करावे

या दिवशी विवाहीत महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. हे पतीच्या आनंदी , दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्याचे प्रतीक मानले जाते. महिलांनी प्रामुख्याने हिरव्या रंगाचा वापर करतात कारण ते उदारतेचे प्रतीक मानले जाते.

हरियाली तीजमध्ये (Hariyali Teej) विवाहित महिलेचे आई-वडील साड्या, मेकअपचे सामान, फळे इत्यादी भेट म्हणून देतात.

या दिवशी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा, प्रत्येकाच्या आनंदाची काळजी घ्यावी, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.

या दिवशी विवाहित महिलांनी तीजची व्रत कथा वाचावी. त्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही.

हरियाली तीजच्या (Hariyali Teej) दिवशी पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची कथा वाचावी.

* या गोष्टी करणे टाळा

या दिवशी चिडचिड करणे टाळावे, कोणाचा अपमान करू नये आणि मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावना येऊ देऊ नका.

हरियाल तीजच्या (Hariyali Teej) दिवशी आपल्या पतीसोबत खोटे बोलु नये.

व्रतादरम्यान काळे आणि पांढरे कपडे घालणे टाळावे.

या व्रतदारम्यान पाणी पिणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT