Mopa Airport Photos |  Dainik Gomantak
Image Story

Mopa Airport Interior: 'मोपा'च्या अंतरंगात, पाहा विमानतळाच्या आतील फोटो

गोव्यातील नव्याने सुरू झालेले मोपा विमानतळ उद्धाटनासाठी सज्ज झाले आहे.

Pramod Yadav
Mopa Airport Photos

गोव्यातील नव्याने सुरू झालेले मोपा विमानतळ उद्धाटनासाठी सज्ज झाले आहे. रविवारी (दि.11) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. मोपा विमानतळाच्या आतील फोटो नुकतेच प्रसारित झाले आहेत. यामध्ये विमानतळाचे रूप अतिशय लोभस दिसत आहे.

Mopa Airport Photos

पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी सुमारे 2,870 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Mopa Airport Photos

पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी 4.4 दशलक्ष प्रवाशांची ये-जा क्षमता असेल, ती टप्प्याटप्प्याने वाढून 33 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. 

Mopa Airport Photos

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa Internatinal Airport) सौर उर्जा संयंत्रे, इको फ्रेन्डली इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेची व्यवस्था यासह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.

Mopa Airport Photos

या विमानतळाच्या उभारणीसाठी त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.

Mopa Airport Photos

विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा यासह अनेक सोयी सुविधांचा समावेश आहे.

Mopa Airport Photos

मोपा विमानतळाचे रविवारी उद्धाटन होणार असल्याने विमानतळाच्या आतील काम बऱ्याच प्रमाणावर पूर्ण झाले आहे.

Mopa Airport Photos

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या फेज 1 चे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, मोपा 06 जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT