Patoleo 
Image Story

Goan Sweet Dish: यंदाच्या नागपंचमीला करुन पाहा खास गोवन पद्धतीच्या 'पातोळ्या'

गोमन्तक डिजिटल टीम
Patoleo

गोवन पदार्थ

गोव्यातील खाद्य परंपरेत तांदूळ आणि नारळाचा जास्त वापर होतो. या दोन्हींचा वापर करून एक खास पदार्थ कोकणामध्ये बनतो. तो पदार्थ कोणता आहे याची आपण माहिती घेऊ.

Sweet Dish

सणासुदीचे गोड पदार्थ

गोव्यात सण अजूनही परंपरिक पद्धतीने साजरे होतात. श्रावण सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते आणि त्याबरोबरच खास गोवन चवीचे पदार्थ.

Patoleo

गोड पातोळ्या 

श्रावणातील पहिला सण नागपंचमी असतो. या निमित्याने पातोळ्या हा खास पदार्थ केला जातो. याचबरोबर गणेश चतुर्थीमध्येही हा पदार्थ केला जातो.

Turmeric Leaves

हळदीच्या पानांचा वापर

पातोळ्या बनवताना लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदीचे पान. या पद्धतीमुळे या गोड पदार्थाचे महत्व वाढते.

Patoleo

लागणारे साहित्य

गूळ, ओले खोबरे, तांदळाची पिठी, वेलदोडयाची पूड आणि हळदीचे पान या गोष्टी पातोळ्या बनवण्यासाठी लागतात.

Patoleo

कसे बनवाल

ओले खोबरे, गूळ आणि वेलदोडयाची पूड शिजवून आधी सारण बनवतात. त्यानंतर तांदूळ शिजवून उकड बनवतात. हळदीच्या पानावर उकड थापून त्यावर सारण पसरवून मग पान दुमडावे आणि वाफवून घ्यावे.

Patoleo

साजूक तुपाची सोबत

वाफवून झाल्यावर हळदीचे पान बाजूला काढून गरमगरम पातोळ्या साजूक तुपासोबत खाव्यात.

East Indian Leaf Cake

ईस्ट इंडियन लीफ केक

इंडियन कॅथलिक याला ईस्ट इंडियन लीफ केक असेही म्हणतात. पातोळ्या हा पदार्थ त्यांच्यातही विविध कार्यक्रमांमध्ये केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT