Summer Tips Dainik Gomantak
Image Story

Summer Tips: उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे

वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे महिला असो वा पुरूष हलके कपडे घालण्यास प्राधान्य देतात.

दैनिक गोमन्तक
Summer Tips

या उन्हाळी हंगामात (Summer), लोक त्यांच्या पोशाखांची अधिक काळजी घेतात कारण वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे महिला असो वा पुरूष हलके कपडे घालण्यास प्राधान्य देतात. काही लोक या हंगामात फक्त सुती कपडे घालतात कारण त्यांना इतर कापडातील वैशिष्ट्य समजत नाही. ते कसे असेल आणि त्यापेक्षा जास्त गरम होणार तर नाही असे प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत कॉटन व्यतिरिक्त काही फॅब्रिक्स असे असतात की ते परिधान केल्यावर गरम वाटत नाही. म्हणून उन्हाळ्यात कोणते फॅब्रिकचे कपडे घालावेत हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

Summer Tips

खादी - आजही अनेकांना खादीचे कापड घालायला आवडते. काळानुसार या ड्रेसमधील अनेक प्रकारचे आउटफिट्स बाजारात येऊ लागले आहेत. उन्हाळ्यात तुम्ही या फॅब्रिक रेडी आउटफिटने तुमचा लुक आणखी खुलून दिसू शकतो. खादी कापूस किंवा रेशमापासून बनविली जाते. आपल्या संस्कृतीत खादीला विशेष महत्त्व आहे. आजच्या वाढत्या आधुनिकतेच्या काळातही खादीची लोकप्रियता खूप जास्त आहे. उन्हाळ्यात या फॅब्रिकपासून बनवलेले कपडे परिधान केल्याने तुम्हाला खूप हलके आणि थंड वाटते.

Summer Tips

ऑरगॅनिक कॉटन- जर आपण हलके आणि आरामदायक फॅब्रिकबद्दल बोललो तर कॉटनचे नाव सर्वात वर येते. हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि बहुमुखी फॅब्रिक आहे. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांच्या वॉर्डरोबमध्ये कॉटनच्या पोशाखांचे कलेक्शन असते. अनेक पारंपारिक कपडे ते फॅशनेबल कपडे सुतापासून बनवले जातात, त्यामुळे यावेळी उन्हाळ्यात सेंद्रिय सुती कपडे देखील घालावेत.

Summer Tips

लिनन- सुती कापडानंतर जर कोणते फॅब्रिक जास्त पसंत केले जात असेल तर ते तागाचे आहे. लिनेन एक अतिशय मऊ आणि सैल विणलेले फॅब्रिक आहे. हे कापड अतिशय आरामदायक आहे. उन्हाळ्यात शरीरातून बाहेर पडणारा घाम लिनेन कापड पूर्णपणे शोषून घेतो.

Summer Tips

साम्ब्रे डेनिम- चेंबरे फॅब्रिक हे अतिशय पातळ आणि हलके फॅब्रिक आहे जे डेनिमसारखे दिसते. हे कापड सामान्य कापसापासून बनवले जाते. ते तुमच्या शरीरातील घाम शोषून घेते. तसेच, उन्हाळ्यात या कापडामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डेनिमऐवजी हा ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्रा हत्याकांडात मजुराच्या निर्घृण हत्येप्रकरणी पिता-पुत्र अटकेत!

Bollywood Ramayan: ''रामायणाला हातच लावायला नको होता!' रणबीर-साई पल्लवीच्या सिनेमावर सीतेची नाराजी

Mapusa Accident: म्हापसा येथे बसच्या धडकेत सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू Video

Goa Live News: कर्नाटकच्या मद्यधुंद तरुणांकडून युवतीचा छळ

E-Sakal दुसऱ्यांदा टॉपर; 16.5 मिलियन युजर्ससह ठरले भारतातील नंबर वन मराठी डिजिटल पोर्टल

SCROLL FOR NEXT