Diabetes Care Dainik Gomantak
Image Story

Diabetes Care: हिवाळ्यात डायबिटीज ठेवा कंट्रोल; करा फक्त 'या' 5 फूड्सचा समावेश

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवायण्यासाठी खास उपाय कोणते करावे हे जाणून घेउया.

दैनिक गोमन्तक

Winter Foods to Control Diabetes: डायबिटीज असणाऱ्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. जर तुम्ही मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण असाल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही या गोष्टींचा समावेश आहाहरात करु शकता.

लसुण
  • लसुण

लसूण मधुमेही लोकांसाठी खुप उपयुक्त आहे. तुम्ही लसुण चटणी तयार करुन आहारात समावेश करु शकता. तसेच संशोधनात असे दिसून आले की रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यासाठी लसुण खाणे आरोग्यदायी असते.

पालक
  • पालक

    पालकामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे मधुमेही लोकांसाठी उपयुक्त ठरु शकते. पालकामध्ये फॉलिक अॅसिड असते. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मेथी दाणा
  • मेथी दाणा

    मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना तुमच्या आहारात समावेश करु शकता. मेथीचे सेवन करण्यासाठी त्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करु शकता.

नाचणी
  • नाचणी

    नाचणी हे एक प्रकारचे धान्य आहे. ज्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. नाचणीच्या भाकरीमध्ये प्रथिने, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट आणि खनिजे यांसारखे गुणधर्म आढळतात. जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात.

शेंगा

शेंगा

मधुमेहामध्येही शेंगा खाण्याचा सल्ला देतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह शेंगा हा सर्वात स्वस्त पर्यायांपैकी एक आहे. मधुमेहींनी आपल्या आहारात शेंगांचा समावेश करावा. हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांसह फायबरमध्ये समृद्ध मानले जाते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शेंगा प्रभावी ठरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT