5 famous lakes in Rajasthan

 

dainik gomantak

Image Story

काश्मीरचा आनंद घ्या उदयपुरमध्ये

सरोवर शहरातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या तलावाला भेट देतात.

दैनिक गोमन्तक

5 famous lakes in Rajasthan

पिछोला सरोवर

पिछोला सरोवर हे राजस्थानमधील सर्वात प्रसिध्द सरोवरांपैकी एक आहे. या सरोवरात दोन बेटे असून या बेटांवर प्रसिध्द असे राजवाडे बांधलेले असून तेथे जग निवास आहे. ज्यातील एक लेक पॅलेस हॉटेल या नावाने तर दुसरे जग मंदिर या नावाने ओळखले जाते. या राजवाड्यांवर बोटीतून जावे लागते. याशिवाय अरवलीच्या डोंगररांगांचे दृश्य विलोभनीय असून येथील भव्य सिटी पॅलेसच्या दृश्याचा आनंद लुटता येतो. हे सरोवर शहरातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या तलावाला भेट देतात

5 famous lakes in Rajasthan

फतेह सागर तलाव, उदयपूर

उदयपूरला तलावांचे नैसर्गिक सौंदर्य असल्यामुळे दुसरे काश्मीर म्हणून ओळखल्या जाते. एक चित्तथरारक तलाव, फतेह सागर तलाव हे तेथिल नैसर्गिक सौंदर्य आहे.या तलावात तीन बेटे आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या बेटाचे नाव नेहरू पार्क आहे. येथे एक रेस्टॉरंट असून लहान प्राणीसंग्रहालय देखील आहे. तर इतर दोन उदयपूर सौर वेधशाळा आणि राम प्रताप पॅलेस येथे आहेत. या ठिकाणचे सौंदर्य आणि शांत वातावरण यामुळे ते एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ बनले आहे.

5 famous lakes in Rajasthan

पुष्कर सरोवर

पुष्करमध्ये नैसग्रीक सलेल्या या तलावाला हिंदू धर्मग्रंथांमध्ये पवित्र असा तलाव मानल्या जातो . हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की,हे सरोवर साक्षात भगवान ब्रह्मदेवाच्या हातातून पडलेल्या कमळाच्या पाकळीने निर्माण केले होते. तसेच या तलावाभोवती 300 मंदिरे असून 52 घाट आहेत. हे केवळ पर्यटन स्थळच नाही तर त्यातील पाणी औषधी देखील मानले जाते जे त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करू शकते. या तलावात स्नान करणाऱ्यांना मोक्षप्राप्ती होते, असेही सांगितले जाते.

5 famous lakes in Rajasthan

सांभार तलाव, जयपूर

सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. जयपूरपासून सुमारे 60 किमी आणि अजमेरपासून 82 किमी अंतरावर असलेले हे तलाव 22. 5 किमी परिसरात पसरले असून. या तलावाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मीठ म्युझियम आणि मीठप्रयोगशाळा. तलावातून दरवर्षी 196000 टन मीठ तयार होते.

5 famous lakes in Rajasthan

आना सागर तलाव, अजमेर

प्रसिद्ध राजा पृथ्वीराज चौहान यांचे आजोबा अर्णोराज चौहान यांनी बांधलेला आना सागर हा अजमेरमधील सर्वात मोठा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी एक बेट असून बोटीने येथे पोहोचू शकता. तसेच शांततापूर्ण वातावरणाव्यतिरिक्त, आपण येथे अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT