इस्त्रायल-इराण तणाव: इस्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरु असतानाच, इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिणगी पडली आहे.
मिसाईल हल्ला: हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरुल्लाह याची हत्या केल्यानंतर इराणने शेकडो मिसाईल इस्रायलवर डागली.
तिसऱ्या महायुद्धाची तयारी: आता इस्रायल याला उत्तर म्हणून कोणते पाऊल उचलणार यावरुन जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.
मिसाईल हवेत नष्ट: इराणकडून आलेली अनेक मिसाईल्सना इस्त्रायलने हवेत नष्ट केले.
एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम: इस्रायलच्या अत्याधुनिक एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीमने इराणचा हा हल्ला परतवला. चला तर मग आज (6 ऑक्टोबर) या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील कोणत्या देशाकडे एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम आहे याबद्दल जाणून घेवू.
चीन: चीनकडे HQ-9 ही एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम आहे. यात सर्वात उंचावरुन येणाऱ्या शत्रूची विमाने, क्रुझ मिसाईल, हवेतून जमिनीतून हल्ला करणारी मिसाईल, टॅक्टिकल बॅलिस्टीक मिसाईल आणि हॅलिकॉप्टरना टार्गेट करुन नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे.
अमेरिका: पॅट्रियट (एमआयएम-104 ) ही अमेरिकेने विकसित केलेली एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल प्रणाली सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यास सक्षम आहे.
इस्रायल: डेव्हिड स्लिंग ही इस्रायलची वायू आणि मिसाईल संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे विकसित केलेली आहे.
रशिया: 1990 च्या दशकात रशियाच्या अल्माज सेंट्रल डीझाईन ब्युरोने विकसित केलेले एस-400 ट्रायम्फ एक जमीनीवर हवेत डागता येणारी मिसाईल प्रणाली आहे.
भारत: भारताने उन्नत एण्टी मिसाईल संरक्षण प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. यात स्वदेशी प्रणालीसह विदेशी प्रणालीचा अंतर्भाव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.