Valentine Day Dainik Gomantak
Horoscope

Valentine Day 2026: सिंगल आहात? काळजी करु नका! व्हॅलेंटाईन डे ठरणार 'स्पेशल', 14 फेब्रुवारीला 'या' 3 राशींच्या आयुष्यात बहरणार प्रेम; जोडीदाराशी वाढणार जवळीक

Valentine Day 2026: दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेम, रोमान्स आणि स्नेहाचा उत्सव म्हणून म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो.

Manish Jadhav

Valentine Day 2026: दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेम, रोमान्स आणि स्नेहाचा उत्सव म्हणून म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यंदाचा व्हॅलेंटाईन डे केवळ प्रेमी युगुलांसाठीच नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत विशेष ठरणार आहे. या दिवशी चंद्राचे नक्षत्र गोचर होणार असून ज्योतिषशास्त्रात चंद्राला सुख, मन, भावना आणि मानसिक स्थितीचा कारक मानले जाते.

पंचांगानुसार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी चंद्र धनु राशीत असताना संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. यापूर्वी चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात असेल, मात्र व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळपासून 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत चंद्र उत्तराषाढा नक्षत्रातच मुक्काम करेल. या नक्षत्र बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना आपले प्रेम (Love) मिळण्याचे योग आहेत, तर काहींचे वैवाहिक आयुष्य बहरणार आहे.

कर्क राशीच्या जातकांसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. विशेषतः जे तरुण-तरुणी सिंगल आहेत आणि आपल्या जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते. कदाचित तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचे आगमन होईल जी तुमची जीवनसाथी बनू शकते. यासोबतच, जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर त्या नात्याला घरच्यांकडून अधिकृत मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा असेल. विवाहित व्यक्तींवरही या चंद्र गोचरचा शुभ प्रभाव पडणार असून, त्यांना आपल्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि नात्यातील गोडवा वाढवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या दृष्टीने हा काळ अविस्मरणीय ठरु शकतो. ज्यांना अद्याप आयुष्यात एकदाही प्रेम मिळालेले नाही, अशा व्यक्तींना या दिवशी 'लव्ह ॲट फर्स्ट साईट' म्हणजेच पहिल्या नजरेतील प्रेमाचा अनुभव येऊ शकतो. आनंदाची गोष्ट म्हणजे, ज्यांच्यावर तुमचे प्रेम जडेल ती व्यक्तीदेखील तुमच्या प्रेमात वेडी होण्याची चिन्हे आहेत. जे लोक आधीच गंभीर नात्यात आहेत किंवा ज्यांचे लग्न ठरले आहे, त्यांना आपल्या मनातील गुपिते किंवा भावना जोडीदारासमोर व्यक्त करण्याची उत्तम संधी मिळेल. यामुळे तुमच्यातील दुरावा कमी होऊन जवळीक वाढेल. विवाहित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील हा दिवस अत्यंत रोमँटिक आणि सुखद असेल.

मीन राशीच्या जातकांसाठी व्हॅलेंटाईन डेचा हा सण भाग्याचा ठरणार आहे. जर तुम्ही मनही मन आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला पसंत करत असाल, तर मनात कोणतीही भीती न ठेवता त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करा. ग्रहांची स्थिती पाहता, समोरुन सकारात्मक उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. विवाहित जोडप्यांमधील मतभेद दूर होऊन त्यांच्यातील जवळीक वाढेल. तसेच, आपल्या लव्ह पार्टनरसोबत छोटी सहल किंवा रोमँटिक प्रवासाला जाण्यासाठी मीन राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे हा उत्तम मुहूर्त आहे. एकूणच, चंद्राचा हा नक्षत्र बदल कर्क, वृश्चिक आणि मीन या तीन राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वसंत घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT