Surya Gochar Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: 17 सप्टेंबरपासून 5 राशींचा महाभाग्योदय! सूर्य देवाच्या आशीर्वादाने जॅकपॉट; धनलाभाची मोठी संधी

Surya Gochar 17 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव येत्या 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Manish Jadhav

Surya Gochar 17 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव येत्या 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या महत्त्वपूर्ण खगोलीय घटनेला कन्या संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्याचे हे राशी परिवर्तन सर्व 12 राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव टाकणारे ठरणार असले, तरी विशेषतः 5 राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. या गोचरमुळे संबंधित राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल आणि समाजात मानसन्मान वाढेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे भ्रमण अत्यंत अनुकूल सिद्ध होणार आहे. या काळात मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि आर्थिक दृष्ट्या परिस्थिती मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात नफ्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. कन्या राशीमध्येच सूर्याचे गोचर होत असल्याने या राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सुखाचे आगमन होईल. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती (Promotion) आणि धनलाभाची शक्यता असून कार्यक्षेत्रात त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे परिवर्तन शुभ फलदायी ठरणार आहे. थकित पैसे परत मिळण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागल्याने आत्मविश्वास उंचावेल आणि वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. दुसरीकडे, धनु राशीच्या नोकरीपेशा लोकांना कारकिर्दीत मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल.

मीन राशीच्या लोकांसाठी देखील सूर्याचे कन्या राशीतील आगमन अत्यंत फायदेशीर ठरेल. कामात अधिक लक्ष लागल्यामुळे अपेक्षित यश सहज साध्य होईल. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अनेक सुवर्ण संधी चालून येतील, ज्यामुळे भविष्यातील योजना आखणे सोपे जाईल. एकूणच, 17 सप्टेंबरच्या या सूर्य गोचरमुळे या पाचही राशींच्या व्यक्तींना प्रगतीची नवी दिशा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT