Surya Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

Sun transit in Hasta Nakshatra 2026: सूर्य ग्रहाने रविवारी (27 सप्टेंबर) दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी हस्त नक्षत्रात प्रवेश केला असून, सूर्य आता 11 ऑक्टोबरच्या सकाळी 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत याच नक्षत्रात विराजमान असणार आहे.

Manish Jadhav

Sun transit in Hasta Nakshatra 2026: सूर्य ग्रहाने रविवारी (27 सप्टेंबर) दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी हस्त नक्षत्रात प्रवेश केला असून, सूर्य आता 11 ऑक्टोबरच्या सकाळी 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत याच नक्षत्रात विराजमान असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हस्त नक्षत्राचे आधिपत्य चंद्राकडे असते आणि या नक्षत्रातील सूर्याचे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. सूर्याच्या या गोचरमुळे तब्बल 5 भाग्यवान राशींच्या जातकांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरु होणार असून त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अत्यंत सुखद आणि सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील.

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून धनलाभाचे मजबूत योग जुळून येत आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सहकाऱ्यांची आणि वरिष्ठांची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.

कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य गोचर खूप शुभ फलदायी ठरणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे आता सुरळीतपणे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मानात मोठी वाढ होईल आणि आत्मविश्वास उंचावल्यामुळे कठीण निर्णय घेणे सोपे जाईल. करिअर आणि व्यवसायात भरभराट झाल्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ कौटुंबिक शांतता आणि आनंदाचा असणार आहे. घरामध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. या काळात काही चांगल्या निमित्ताने प्रवासाचे योग बनत असून, हा प्रवास भविष्यात आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे आणि कामाचे सर्वजण कौतुक करतील, ज्यामुळे मन अतिशय प्रसन्न राहील.

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर संपत्ती आणि उत्पन्नात वाढ घडवून आणणारा ठरण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन आणि उत्तम संधी चालून येतील, ज्यामुळे पदाेन्नती (Promotion) किंवा चांगल्या पगाराचा मार्ग मोकळा होईल. हातात घेतलेले प्रत्येक काम यशस्वी होईल आणि कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण कायम राहील.

मीन राशीच्या जातकांसाठी ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचे हे गोचर सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारे ठरेल. जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल, तर त्या त्रासातून लवकरच सुटका होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नव्या व्यवसायाची किंवा चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

Attempted Murder Case: शरीफ शेखचा जामीन अर्ज फेटाळला; पीडिता, साक्षीदारांना धमकावल्याची न्यायालयाकडून दखल

CRC Centre: केंद्रातर्फे गोव्यासाठी उभारले जाणार 40 कोटींचे 'सीआरसी' केंद्र, राज्यातील दिव्यांगांसाठीच्‍या विविध सुविधा येणार एकाच छताखाली

Monsoon: मान्सूनचे शेवटचे तीन दिवस उरले, पण पावसाची तूट कायम! राज्यात यंदा तब्बल 36.41 इंच कमी पाऊस, अवघ्‍या तीनच केंद्रांवर 'शतक'

SCROLL FOR NEXT